शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा ‘विज्ञान रथ’ दोन वर्षापासून अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:02 IST

विज्ञान प्रसाराचे नुसतेच नाव

जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठाकडून ‘फिरते विज्ञान रथा’ची निर्मिती करण्यात आली होती़ मात्र, तब्बल दोन वर्षांपासून हा विज्ञान रथ विद्यापीठाच्या एका गोडावूनमध्ये अडगळीत पडून आहे. विज्ञान रथ तयार करणारे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ महाराष्ट्रातलं पहिले होते़विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि आदिवासी भाग येतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी विद्यापीठ व केरला स्टेट सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी म्युझिअम आणि प्रियदर्शनी तारांगण, त्रिवेंदम यांच्यात माजी कुलगुरू डॉ़ के ़बी़पाटील यांच्या कार्यकाळात सामंजस्य करार करून विज्ञान रथाची निर्मिती करण्यात आली होती़ तब्बल ३८ लाख रूपये खर्च करून हा रथ तयार करण्यात आला होता़विज्ञान रथात २४ वर्कींग मॉडेल्सया रथामध्ये न्यूटन कँडल्स, बॉल, पायथागोरसचा सिद्धांत, फ्लोटिंग मॅॅग्नेट, मॅग्झिमम एरिया, इमेज, लेझी ट्यूब, इलेक्ट्रो मॅग्नेट, कलर फ्लोटिंग मॅजिक, डान्सिंग रिंग्ज, जंपिंग डिस्क, ब्लॅक बॉडी रेडिएशन, कलर मिक्सिंग, मॅकेनिकल स्कॅनर, म्युच्युअल इंडक्शन, व्होरेटेक्स, मिरर इमजे, कॅलिडोस्कोप, डबल कोन रोलिंग अप हिल, टनेल, जनरेशन आॅफ इलेक्ट्रिसिटी अशा तब्बल २४ वर्किंग मॉडेल्सचा समावेश आहे.दुरूस्तीसाठी पत्रव्यवहार पण, पुढे काहीही नाहीविज्ञान रथाच्या दुरूस्तीसाठी त्रिवेंदम येथील संस्थेशी विद्यापीठाकडून पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचे समजते़ मात्र, दोन वर्षात पाठपुराव्याच्या अभावामुळे कुठल्याही हालचाली न झाल्यामुळे विज्ञान रथ हा पडून आहे़ यासाठी विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज आहे़ दरम्यान, या याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृ ती खराब असून रूग्णालयात दाखल असल्याचे सांगत माहिती देण्यास टाळले़दरवाजे व मॉडेल्स नादुरूस्तदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण करणारा रथ मात्र, दोन वर्षांपासून ना-दुरूस्त आहे़ रथातील दरवाजे सोबतच काही मॉडेल्स हे काम करित नसल्यामुळे हा रथ शिक्षण भवनाजवळील एका गोडावूनमध्ये अडगळीत पडलेला आहे़ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रथ गोडावूनमध्ये पडून असल्याची ओरड आहे़ आजही या रथाची मागणी होत असताना विद्यापीठाच्या दुर्लक्षामुळे निव्वळ रथ पडून आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव