शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:23 IST

बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले.

ठळक मुद्देदोन दिवस पाहुणचारगोडधोड जेवणाने देणार गोड निरोप

चाळीसगाव : मजल दरमल करीत पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रात येणा-या बाळूमामांच्या मेंढ्यांविषयी ग्रामीण भागात आपुलकीसह भक्तिभावदेखील पहावयास मिळतो. या मेंढ्या साधारण डिसेंबरच्या पूर्वाधात चरण्यासाठी दाखल होत असतात. तीन ते चार महिने त्यांचा गावोगावी मुक्काम असतो. गुरुवारी बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले. ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने त्यांचे वेशीवरच स्वागत केले. पाठीवर संसाराचे बि-हाड आणि सोबतीला मेंढ्यांचा तांडा. धनगर बांधवांचे जीवन असे भटकंतीवर असते. मजल दरमजल करीत या मेंढ्या राज्यभर चरण्यासाठी भ्रमंती करीत असतात. विशेषतः ग्रामीण भागात बाळूमामांच्या यामेंढ्याविषयी गावक-यांना ममत्व असते. यामुळेच मेंढ्या गावात आल्या की, त्यांचे वेशीवरच आबाल- वृद्धांसह स्वागत केले जाते.  सिद्धेश्वर आश्रमात मुक्काम आणि पाहुणचारगुरुवारी दुपारी दोन वाजता बेलदारवाडीत बाळू मामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांच्या सात वाड्यांचे आगमन झाले. दोन हजाराहून अधिक मेंढ्या आणि त्यांच्यासोबत असणारे २०० धनगर बांधव यांना येथील सिद्धेश्वर आश्रमात दोन दिवसीय मुक्कामात पाहुणाचार दिला जाणार आहे. आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील निवृत्तीनाथ महाराज तरुण मंडळाचा यात सक्रीय सहभाग आहे.मेंढ्यासाठी दिले बागायती कपाशीचे शेतसंभाजी केशरलाल कुमावत यांनी आपले दोन एकर बागायती कपाशीचे शेत बाळू मामांच्या मेंढ्यांना चरण्यासाठी उपलब्ध करुन दिले. आपल्या शेताला बाळू मामांच्या मेंढ्यांचे पाय लागले. याचे मोठे समाधान असून म्हणूनच त्यांना चरण्यासाठी हिरव्यागार कपाशीचे शेत दिले. अशी आनंदी प्रतिक्रिया संभाजी कुमावत यांनी व्यक्त केली.आज एकादशीचे फराळ, शनिवारी गोड शिरागुरुवारी रात्री आठ वाजता सिद्धेश्वर आश्रमात आरती झाल्यानंतर  मेंढ्यांसोबत आलेल्या धनगर बांधवांना आमटी, भाकरी आणि भात असे जेवण दिले गेले. पंचक्रोशीतील पाचशेहून अधिक भाविकांचीही उपस्थिती होती.  आज शुक्रवारी एकादशी असल्याने साबुदाणा खिचडी, केळी तर रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी दिली जाईल. शनिवारी बाळूमामांसह  मेंढ्यांनाही निरोप दिला जाणार असून आठशे भाविकांना देखील  वरण - भट्टी व गुळाचा गोड शिरा असा खान्देशी मेनू असणार आहे. अशी माहिती भाऊलाल कुमावत यांनी 'लोकमत'ला दिली. यशस्वीतेसाठी गोरख कुमावत, जितेंद्र कुमावत, प्रकाश कुमावत आदिंसह ग्रामस्थ मंडळी सहकार्य करीत आहे. 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारChalisgaonचाळीसगाव