शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

घरातील दु:खद घटना दर्शविणा-या ‘उलटा मांडव’ची अनोखी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:17 IST

ग्रामीण भागात आजही परंपरा कायम

ठळक मुद्देमृतकाच्या दारात उलटा मांडवअंत्यविधीचे विविध सोपस्कार

मतीन शेख / ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 17-  : भारतीय संस्कृती विविध चालीरीती व परंपरांनी नटलेली आहे. देशात विविध धर्मासह हजारो जातींचे लोक एकोप्याने वास्तव्यास आहे. अशात अनेक चाली रीती व परंपरेचे साम्य प्रामुख्याने उमटून येतात. यात आनंदाच्या प्रसंगी शामियाना वजा मांडव सजावटीचा तर दु:खद प्रसंगी आजही  ग्रामीण भागात मृतकाच्या दारात उलटा मांडव टाकण्याची प्रथा पहावयास मिळतेधर्म व विविध जाती तशा चालीरीतीनुसार अंत्यविधी कार्ये आपल्याला पहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने हिंदू धर्मात अग्नीडाग देत  तर मुस्लीम धर्मात दफनविधीने अंत्यविधीचे विविध सोपस्कार पार पाडले जातात. काही चालीरीती धर्मग्रंथानुसार व धर्म शास्त्र नुसार तर काही जुन्या चालीरीतीने व परंपरेने पार पाडल्या जातात.त्याचाच एक भाग अगदी सर्व ठिकाणी साम्य स्वरूपात दिसून येतो तो मृतकाच्या अंगणात दु:खाचे प्रतीक म्हणून ‘उलटा मांडव’ टाकण्याची प्रथा वजा परंपरेचे आजही पालन होते.  या बाबत विचार केल्यास उलटा मांडव टाकण्याचे कुठेच  प्रमाण दिसून येत नाही. परंतु दु:खाचे प्रतीक म्हणून आजही ग्रामीण भागात मृतकाच्या दारात उलटा मांडव टाकलेला दिसून येतो. अर्थात उलटा मांडव पाहून प्रथम दर्शनी संबधित घरात दु:खद घटना घडली याचे प्रतीक व्यक्त करण्याचा हा संकेत मानले जाते

ज्या ठिकाणी दु:खद घटना घडली असेल तेथे संबंधितांच्या मागणी प्रमाणे उलटा मांडव टाकला जातो. प्राथमिक दृष्या याठिकाणी दु:खद घटना घडल्याचा हा ‘सिम्बॉलीक’ प्रकार होय- रमेश कापले, संचालक,  टेंट हाऊस, मुक्ताईनगर