जामनेर, जि.जळगाव : आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी नातेवाईकांसोबत नदीवर गेलेल्या मयंक संतोष बºहाट (वय आठ वर्षे) याचा डोहातील गाळात फसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता वाकी खुर्द, ता.जामनेर येथे घडली.वाकी खुर्द येथील बबनराव वसंत बºहाट यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी सकाळी त्यांचा दशक्रिया विधी असल्याने त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक नदीवर गेले होते. मयंक हा मित्रांसोबत नदीत पोहायला गेला. डोहातील गाळात फसल्याने तो बाहेर पडू शकला नाही. ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढले व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.आधीच बबनरावांच्या दु:खात असलेल्या बºहाट कुटुंबियांवर मयंकच्या अचानक जाण्याने दु:खाचा डोंगरच कोसळला. उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांना शोक अनावर झाला होता.
जामनेर तालुक्यातील वाकी येथे बालकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 16:41 IST
आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी नातेवाईकांसोबत नदीवर गेलेल्या मयंक संतोष बºहाट (वय आठ वर्षे) याचा डोहातील गाळात फसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
जामनेर तालुक्यातील वाकी येथे बालकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
ठळक मुद्देआजोबांच्या दशक्रिया विधी प्रसंगीची घटनाआजोबांच्या निधनानंतर बºहाट परिवारावर कोसळले नवीन संकट