शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगरातील वीजनिर्मिती पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 16:13 IST

लोड मॅनेजमेंट सेलकडून मिळाली सूचना : वीस दिवसानंतर वीज निर्मिती झाली पूर्ववत

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.12 - महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील वीज निर्मिती पूर्ववत सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी ‘लोकमत’ ला दिली.
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीज निर्मितीसाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत.
पहिला संच रात्री सुरू
दरम्यान, दीपनगरातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक चार हा 11 जुलै रोजी रात्री 11.44 वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे. दुसरा 500 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक पाच हा आज 12 जुलै रोजी 11.35 वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन्ही संचातून वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी दिली.
संच क्रमांक चारमधून 387  व संच क्रमांक पाच मधून 113 मेगाव्ॉट अशी एकूण 500 मेगाव्ॉट वीज निर्मिती केली जात आहे.
दरम्यान, दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीन लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वीच बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा संच बंद करण्यात आला आहे. 
1 हजार 420 मेगाव्ॉट क्षमतेच्या दीपनगर वीज केंद्रातील वीज निर्मिती पूर्ववत सुरू झाली  आहे. 
 दीपनगर वीज केंद्रातील दर
आजपासून महिनाभर  म्हणजे 12 ऑगस्ट र्पयत दीपनगरातील 500 मेगाव्ॉटच्या दोन्ही संचाचे वीज दर 2.84 पैसे इतके राहतील. मागील महिन्यात या दोन्ही संचाचे वीज दर 2.89 पैसे इतके होते.
राज्याची मागणी
बुधवारी राज्याची वीजेची मागणी 11 हजार 583 मेगाव्ॉट इतकी आहे. महाजनकोची वीज निर्मिती 4 हजार 764 इतकी आहे.
 कामगारांमध्ये आनंद
दीपनगरातील दोन्ही संचातून वीज निर्मिती पूर्ववत सुरू झाली आहे.त्यामुळे खाजगी कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, दीपनगरातील विविध कामगार संघटनांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.
बंद संच असे
राज्यातील वीज निर्मिती केंद्रातील बंद संच असे आहेत. भुसावळ-दीपनगर-2, नाशिक-1, कोराडी-3,पारस-1, परळी-5, चंद्रपूर 1 असे एकूण 13 संच अजूनही बंद आहेत. महाजनकोचे महाराष्ट्रात सात वीज निर्मिती केंद्र आहेत. त्यात भुसावळ, नाशिक, पारस, परळी, खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर असे केंद्र आहेत. त्यात एकूण 32 वीज निर्मिती संच आहेत.
एमओडी (मेरीट ऑर्डर डिसपॅच)
दीपनगरातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच एमओडीमध्ये गणले जातात . महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती खर्चाच्या क्रमाने वीज निर्मिती संच आहेत. त्यानुसार दर निनिश्चित केल जातात. आता  दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील  दर  दोन्ही संचांसाठी 2 रुपये 84 पैसे  निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. वीजेचे दर महिन्याला बदलतात. संच बंदच्या काळात देखभाल व दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता या केंद्रातील दोन्ही संच  कार्यान्वित करण्यात आले आहेत. पूर्ववत वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
मुंबई मुख्यालयातील लोड मॅनेजमेंट सेल प्रशासनाने दीपनगरातील वीज निर्मिती संच कार्यान्वित करण्याची सूचना दिली. त्यानुसार दोन्ही संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. वीज निर्मिती सुरू झाली आहे. या दोन्ही संचातून निर्माण होणा:या वीजेचा दर 2 रुपये 84 पैसे युनिट असा ठेवण्यात आला आहे. वीजेचे दर प्रत्येक महिन्याला कमी-जास्त होतात
                                            - आर.आर.बावस्कर, 
 अभियंता, दीपनगर वीज निर्मिती केंद्र.