शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात सात हजार घरकुले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 16:52 IST

रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात मंजूर असलेल्या ९ हजार ५३८ घरकुलांपैकी ७ हजार २४० घरकुले पूर्ण झाली आहे. यासाठी ५३ कोटी ३५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील विविध यंत्रणामार्फत खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१७ हजार २४८ विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटपरमाई योजनेतंर्गत जिल्ह्यात ७ हजार २४० घरकुले पूर्ण८ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी प्रलंबित

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२० - रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात मंजूर असलेल्या ९ हजार ५३८ घरकुलांपैकी ७ हजार २४० घरकुले पूर्ण झाली आहे. यासाठी ५३ कोटी ३५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील विविध यंत्रणामार्फत खर्च करण्यात आला आहे.जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जयकर उपस्थित होते.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने प्राप्त करुन घ्यावे. तसेच समाजकल्याण विभागाने नियमानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची सूचना मुंडके यांनी केली.या बैठकीत शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती वाटप, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा आढावा घेण्यात आला.शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील १७ हजार २४८ विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले आहे. तर अनिवासी आश्रमशाळेतील ३३४ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड प्रलंबित आहे. तसेच शासकीय वसतीगृहातील ५४८ विद्यार्थ्यांची दुसºया सत्रातील तर ८ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी प्रलंबित असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी बैठकीत दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव