शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याला वाचविण्यास गेलेला मामाही बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:10 IST

हृदयद्रावक घटना : गिरणा नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा : गिरणा नदीपात्रात भातखंडे खुर्द केटीवेअरमध्ये मासे पकडण्यास गेलेल्या भाच्याला वाचविण्यास गेलेला मामाही भाच्यासह बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील भातखंडे खर्दु येथे बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.याबाबत प्राप्त माहिती अशी की, गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असून भातखंडे खुर्द येथील केटीवेअर फुल्ल भरला आहे. २ रोजी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सागर मंगलदास ठाकरे (वय १८) रा.भातखंडे खुर्द हा युवक मासे पकडण्यासाठी नदीपात्रातील केटीवेअरमध्ये गेला. तिथे मासे पकडताना तो पाण्यात बुडाल्याचे समजले. गावातीलच मामा जगदीश जगन सोनवणे (वय ३२) रा भातखंडे खु याने भाच्याला वाचविण्यास उडी घेतली असता मामाही पाण्यात बेपत्ता झाला. मामा भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावातील नागरिकांनी शोधकार्य सुरू केले. मात्र आढळून आले नाही. सागर हा एकुलता एक असून त्याच्या पश्चात फक्त आई आहे. तर जगदीश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, $लहान मुली असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.