हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : हरताळे गावात राजरोसपणे दारुविक्री व पत्ता आदी अवैध धंदे करणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना आळा बसण्याऐवजी अधिक वाढ होत असल्याने महिला वर्गासह जाणकारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.गेल्या पंचवार्षिकीत महात्मा गांधी जयंती दिनी हरताळे येथील महिला सरपंच व महिलांनी ग्रामसभेत दारूबंदी, अवैध धंदे बंद करण्याबाबत ठराव करून दारूबंदी केली होती. यातून काही प्रमाणात का होईना दारूसह अवैध धंद्यांवर अंकूश बसला होता.मो आता काही वर्षापासून पुन्हा अवैध दारू विक्रीत वाढ झाली आहे. वेळोवेळी निदर्शनास येऊनदेखील राजरोसपणे अवैध धंदे व दारू विक्री पुन्हा बोकाळली आहे. आतादेखील अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे.महिलांनी पुन्हा एकत्र येऊन दारूबंदीसाठी प्रयत्न व्हावे, तसेच गावाच्या पोलीस पाटील महिला आहे. त्यांनीदेखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी आशा व्यक्त होत आहे.दारूबंदी गावाच्या आणि जनतेच्या हिताचे आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही ठोस निर्णय घेउन दारूबंदी ठराव करून दारूबंदी केली होती. आताही पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष यांनी दारूबंदीसाठी प्रयत्न करावे. गाव तंटामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.-आनंदराव देशमुख, माजी उपसभापती, पं.स., रावेरगावाला तंटामुक्तीसाठी दारूबंदी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय तंटामुक्ती होऊ शकत नाही. यासाठी लोकांनी सहकार्य केल्यास गावाच्या विकासास हातभार लागेल. शासनाच्या गाव तंटामुक्त योजनेचा लाभास पात्र ठरेल.-सीताराम चौरे, अध्यक्ष,समिती, हरताळे
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे अवैध धंदे खुलेआम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 16:03 IST
हरताळे गावात राजरोसपणे दारुविक्री व पत्ता आदी अवैध धंदे करणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना आळा बसण्याऐवजी अधिक वाढ होत असल्याने महिला वर्गासह जाणकारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे अवैध धंदे खुलेआम सुरू
ठळक मुद्देमहिला वर्गात प्रचंड संतापदारूमुळे तरुणाईतच संसाराची राखरांगोळीगाव तंटामुक्तीच्या उंबरठ्यावर अन् दुसरीकडे विदारक स्थिती