शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उमाळ्याचा विद्यार्थी ठार, दुसरा जखमी

By admin | Updated: March 4, 2017 00:56 IST

फर्दापूरजवळील दुर्घटना : बारावीचा पेपर आटोपून येत होते परत

पहूर/ फर्दापूर/ जळगाव : गोसेगाव, ता.सिल्लोड येथून बारावीचा पेपर आटोपून घरी येत असताना उमाळा, ता.जळगाव येथील दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करणाºया कारने समोरून धडक दिल्याने त्यात अक्षय युवराज पाटील (वय २५) हा जागीच ठार झाला तर पवन ज्ञानेश्वर पाटील (वय २२) हा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी वाकोद व फर्दापूर दरम्यान एका हॉटेलजवळ घडली.अक्षय व पवन या दोघांनी गोसेगाव येथील महाविद्यालयात बारावीला प्रवेश घेतला होता. त्यामुळे परीक्षेसाठी ते दररोज तेथे दुचाकीने जात होते. शुक्रवारी इतिहासचा पेपर दिल्यानंतर दोघेही दुचाकीने (क्रमांक- एमएच १९/ बीयू ०४३८ ) घरी येत असताना फर्दापूर व वाकोद गावाच्या दरम्यान औरंगाबादकडे जाणाºया कारने (क्रमांक-एमएच १२- झेड ०३७२) ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. त्यात अक्षय हा जागीच ठार झाला. तर पवन हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जळगाव बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील हे दोघांच्या नातेवाइकांना घेऊन तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात गेले. तेथून दोघांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. अक्षय याच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. कंपनीत काम करून तो शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार                         आहे.दरम्यान, या अपघाताची फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नीलेश घोरपडे आणि सहकारी करीत आहेत.