शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील करंजी येथे दोघा तरुणांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 19:33 IST

बांधकामाला अडथळा ठरत असलेली झाडाची फांदी तोडल्याचा राग आल्याने चौघांनी दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी करंजी, ता.यावल येथे घडली.

ठळक मुद्देझाडाची फांदी तोडल्याचा आला रागकरंजी येथील घटना चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : बांधकामाला अडथळा ठरत असलेली झाडाची फांदी तोडल्याचा राग आल्याने चौघांनी दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी करंजी, ता.यावल येथे घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेसूत्रांनुसार, तालुक्यातील करंजी येथे सुगंधाबाई सोपान पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला जवळच असलेल्या निंबाच्या झाडाची फांदी अडथळा ठरत होती. ती फांदी सुगंधाबाईचा मुलगा विजय पाटील व पुतण्या तेजराव पाटील यांनी तोडली.झाडाची फांदी तोडल्यामुळे जवळच असलेल्या सचिन सीताराम पाटील, सीताराम राजाराम पाटील, निर्मलाबाई सीताराम पाटील (रा.करंजी) व व नवीन रामचंद्र पाटील (रा.वडगाव, ता.रावेर) अशा चौघांनी विजय व तेजराव यांना लोखंडी आसारीने डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत दोघांना जबर दुखापत झालेल्या अवस्थेत जखमी विजय पाटील यांनी आपली आई सुगंधाबाई व जखमी चुलत भाऊ तेजराव यांच्यासह फैजपूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना मेमो देऊन वैद्यकीय उपचारासाठी पाठवले.याप्रकरणी सचिन सीताराम पाटील, सीताराम राजाराम पाटील, निर्मलाबाई सीताराम पाटील व नवीन रामचंद्र पाटील या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस फौजदार सांगळे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFaizpurफैजपूर