शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतरही ४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:38 IST

शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली थट्टा

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफी योजनेच्या सातत्याने बदललेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा घोळ तब्बल दोन वर्ष होऊनही सुरूच आहे. अद्यापही ४३ हजार ११६ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची १८६ कोटी ७३ लाख १८हजार ६६७ रूपये एवढी रक्कम वर्ग होणे बाकी आहे. यामुळे सरसकट कर्जमाफीचा नवा घोळ सुरू झाला आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून (डीडीआर) माहिती मागविली आहे.सतत चार वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडून थकबाकीदार झालेल्या शेतकºयांना पीककर्जही मिळणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली.आता सरसकट शेतकरी कर्जमाफीचा घोळशेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली बदलत्या अटींमुळे घोळ घातला गेला. तो अजूनही मिटलेला नाही. आता सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची तयारी शासनाने चालविली असून त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे. आधीची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. तर अनेकांना कर्जमाफी मिळूनही थकबाकीदार राहिल्याने त्यांना पिककर्जही मिळू शकलेले नाही. त्यातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ३० जून २०१८ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.शेतकºयांची समस्या कायमचशेतकºयांना कर्जमाफी दिली तरीही बँकांकडून पीककर्ज देण्यास मात्र हात आखडता घेण्यात आला. कर्जमाफीचे सुमारे ६०० कोटी जिल्हा बँकेला मिळूनही बँकेने मात्र कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना ५० टक्केच पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची अंमलबजावणीही केलीे. त्यातच शासन पुन्हा कर्जमाफी करणार अशी चर्चा सुरू होताच उर्वरीत शेतकºयांनीही कर्जफेड थांबविल्याने जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली आहे.अद्यापही ४३ हजार शेतकरी वंचितकर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान व ओटीएस अशा तीन वर्गवारीत ही कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार ४४२ शेतकरी पात्र ठरले. त्यांची ९६६ कोटी ४० लाख ६१ हजार ९९९ रूपये इतकी रक्कम कर्जमाफीसाठी पात्र ठरली. मात्र या प्रक्रियेत आतापर्यंत २ लाख २७६ शेतकºयांच्या खात्यावर ७७९ कोटी ६७ लाख ४३ हजार ३३२ रूपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव