शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात महामार्गावर अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत पुन्हा दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 12:39 IST

भरधाव ट्रकने सहायक फौजदाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी साडे सहा वाजता पुन्हा अजिंठा चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ट्रकचा मागून धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेले सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय ४० रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश) कोसळले व त्यात ट्रकचे टायर डोक्यावरुन गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. या व्यतिरिक्त दोन जण किरकोळ जखमी झाले.

ठळक मुद्देआठवडाभरातील दुसरी घटना दोन जण जखमीलग्नाला येत होते दुचाकीने

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,४: भरधाव ट्रकने सहायक फौजदाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी साडे सहा वाजता पुन्हा अजिंठा चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ट्रकचा मागून धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेले सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय ४० रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश) कोसळले व त्यात ट्रकचे टायर डोक्यावरुन गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. या व्यतिरिक्त दोन जण किरकोळ जखमी झाले.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी, अनिल संजय सय्या एटाकल्ली (वय ३२) व आदी सुरय्या रेड्डी (वय ३५) तिन्ही रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश हे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एम.१२९३) सोमवारी सकाळी लग्नासाठी जळगावात येत होते. अजिंठा चौकात नेरी नाक्याकडे वळण घेत असताना भुसावळकडूनच मागून आलेल्या ट्रकचा (क्र.जी.जे.०३ बी.टी.९३३५) दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे मागे बसलेला सत्ती हा खाली पडला व त्याचवेळी ट्रकचे टायर त्याच्या डोक्यावरुन गेले. या घटनेत सत्तीचा जागीच मृत्यू झाला. आदी हा दुचाकी चालवत होता तर अनिल मध्ये बसलेला होता. यात दोघंही किरकोळ जखमी झाले.