शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज एक किंवा दोन दुचाकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज एक किंवा दोन दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. मंगळवारीसुद्धा गेंदालाल मिल व बजरंग कॉलनीतून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर व शनिपेठ पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

चिकन घेण्यासाठी गेले, तोच दुचाकी झाली चोरी

शेख अकील शेख अजगर हे कुटुंबीयांसह भारत नगरात राहतात. भंगार विक्रीचा व्यवसाय करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी रात्री ८.३० वाजता ते चिकन घेण्‍यासाठी गेंदालाल मिल भागातील लकी चहाच्या दुकानाजवळ आले होते. ८.४५ वाजताच्या सुमारास चिकन घेऊन ते दुचाकी (क्र. एमएच.१९.डी.सी.८१२२) उभ्या केलेल्या ठिकाणी आले असता, त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेऊनसुद्धा मिळून न आल्यामुळे ती चोरीला गेल्याची खात्री झाली, तसेच अजित रशिद पठाण (रा.गेंदालाल मिल) यानेच चोरी केल्याचा त्यांना संशय बळावला आहे. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरासमोरून दुचाकी लांबविली

नितीन लोटू चौधरी हे बजरंग कॉलनीत कुटुंबासह राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच.१९.बीपी.०१२६) ही सोमवारी रात्री घरासमोर उभी केली होती; मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर चौधरी यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.