शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:42 IST

जळगाव : मजुरांना पाणी घेऊन जात असताना मागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार ...

जळगाव : मजुरांना पाणी घेऊन जात असताना मागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विटनेर-नेरी रस्त्यावर घडली. संतोष दशरथ पाटील (४८, रा. विटनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

विटनेर येथे संतोष दशरथ पाटील हे कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. त्यांचे विटनेर शिवारातच शेत असल्यामुळे ते रोज दुचाकीने ये-जा करीत होते. या शेतात कापूस वेचण्यासाठी शेतमजूर रोजंदारीने लावले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने (क्र. एमएच १९ एझेड ४३७७) मजुरांना शेतात पाणी घेऊन जात होते. त्याचवेळी मागून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १९ सीएच २३३३) त्यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिली.

धडक बसताच ३० फूट दूर फेकले गेले

कारची मागून धडक बसताच दुचाकीस्वार शेतकरी संतोष पाटील हे ३० फूट फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार उलटी झाली. कारचालकाने सिटबेल्ट लावले असल्याने एअरबॅग उघडल्या, यात चालक बचावला. दरम्यान, घटनास्थळाहून कार चालक फरार झाला आहे. मयत संतोष पाटील यांचा मृतदेह जिल्हा जिल्हा रुग्णालयात सकाळी शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. यावेळी नातेवाइकांची गर्दी झाली होती, दरम्यान, याप्रकरणी संतोष पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारचालकाविरुद्ध सुरेश अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.