शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन: कालवा सल्लागार समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:50 IST

बोरी व अंजनीला मार्च महिन्यात पाणी मिळणार

ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्यात पुन्हा बैठकशेतीसाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारीला आवर्तन बोरी धरणात ३६० द.ल.घ.फु. मृतसाठा शिल्लक

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१३ - कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी दुपारी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात पार पडली. त्यात जिल्हा प्रशासनाने गिरणा धरणातील सर्व उपलब्ध पाणीसाठा १०० टक्के पिण्यासाठी राखीव करण्याची शिफारस केलेली असताना शेतीसाठी गिरणातून दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बोरी व अंजनीसाठी गिरणातून पाणी सोडण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात पुन्हा बैठक घेऊन मार्च मध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीसाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शेख, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, गिरणा पाटबंधारे अधीक्षक अभियंता पाटीलआदीउपस्थितहोते.गिरीश महाजन यांनी जिल्'ातील मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्यासंदर्भात विचारणा केली. पाणी आरक्षण कसे आहे याबाबत मुंडके यांनी सांगितले की, प्रशासनाने अगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. मात्र गिरणा धरणाचे तीन आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडावे, अशी मागणी आमदारांनी केली. परंतु पाण्याची मागणी पाहता ते शक्य नाही. एरंडोल व पारोळा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून याबाबतही विचार व्हावा, अशी मागणी आ़मदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. शेतीला पाणी द्यावे़ कारण यावर्षी खरीप हंगाम आला नाही़ रब्बी हंगामावर शेतकºयांची मदार असून शेतीला तर पाणी द्या; परंतु बोरी व अंजनी धरणात देखील पाणी सोडावे, अशी मागणी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. त्यावर मार्च महिन्यात पाणी सोडू, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. गुलाबराव पाटील यांनी तीन आवर्तन सोडावे, अशी मागणी केली.शेतीसाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारीला आवर्तनया बैठकीत शेती उपयोगासाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारी रोजी असे दोन आवर्तन देण्याचे ठरले. बोरीधरण तामसवाडी ता.पारोळा या धरणात ३६० द.ल.घ.फु. मृतसाठा शिल्लक आहे, हे पाणी दोन ते तीन महिने पारोळा शहर व परिसराला पाणी पुरवठ्यासाठी पुरेल, असे अधिकारी वर्गाकडून आकडेवरुन सांगण्यात आले. पुढे फेब्रुवारी महिनाअखेर परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन गिरणा धरणाचे शिल्लक पाणी व मृतसाठ्यातून बोरी धरणात व अंजनी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याचे बैठकीत ठरणार आहे. तशी संमती या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आमदार डॉ.सतीश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.