शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे दोन पोलिसात ‘फ्रीस्टाइल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:22 IST

रंगली चर्चा : अदखलपात्र गुन्हा

भुसावळ : शहरातील यावल रोडवरील शासकीय विश्रामगृहाजवळ गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन पोलिसांमध्ये ‘फ्रिस्टाईल’ झाली. हा विषय दिवसभर चर्चेचा ठरला.प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्यातील पो. कॉ. भूषण संजय चौधरी हे शासकीय विश्रामगृहाजवळ उभे असताना त्यांच्याजवळ गोपाळ रामचंद्र सोनवणे हा पोलीस कर्मचारी ( निश्चित पत्ता माहीत नाही ) दारूच्या नशेत आला. व भूषण चौधरी यांना शिवीगाळ करू लागला. तू भुसावळ येथे नोकरी कशी करतो तेच बघून घेईल , असा दमही त्यांनी भरला. यावेळी चौधरी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने पो. कॉ. चौधरी यांना मारहाण केली . यानंतर दोघांमध्ये जोरदार फ्रीस्टाईल सुरू झाली. त्यामुळे यावल रोडवर एकच गर्दी जमा झाली होती. यावेळी तेथे आलेल्या पो. कॉ. राजू नारायण परदेशी व संजय सोनवणे यांनी दोघांमधील वाद मिटविला. यानंतर भुषण चौधरी यांनी शहर पोलीस स्टेशनला येऊन गोपाळ सोनवणे याच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पो. कॉ. गोपाळ सोनवणे यांच्याविरुद्ध कलम ३३२ , ५०४,५०६,५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.