शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
2
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
3
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
4
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
5
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
6
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
7
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
8
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
9
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
10
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
11
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
12
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
13
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
14
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
16
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
17
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
18
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
19
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
20
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या डिक्कीतून पावणेचार लाख लांबविणाऱ्या दोघांची पोलिसांशी झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:46 IST

अमळनेर पोलिसांकडून जळगावच्या दोन जणांना अटक

संजय पाटीलअमळनेर : धुळे शहरात दुचाकीच्या डिक्कीतून पावणे चार लाख रुपये लांबवणाऱ्या जळगावच्या दोघा सराईत गुन्हेगारांना अमळनेर पोलिसांनी झटापटीत पकडले. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक दीपक माळी व पोलीस नाईक रवींद्र पाटील हे २९ रोजी शहरात गस्त घालत होते. तेव्हा सायंकाळी सहाला त्यांना २१ रोजी धुळे येथील बांधकाम भवनच्या आवारातून मोटारसायकलच्या डिक्कीचे कुलूप तोडून त्यातून ३ लाख ८० हजार रुपये चोरणारे दोघे जण बसस्थानकावर असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. धुळे येथील घटनेचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते.पोलिसांना पैलाड भागात जळगाव येथील तांबापुरा कंजरवाडा खदानजवळील सराईत गुन्हेगार अजय बिरजू गारुंगे (वय ३०) व हितेश कृष्णा शिंदे (वय २१, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक एमएच- १९-सीटी-५३१२) वर येत असताना दिसून आले. त्यांनी दोघांना अडवले असता त्यांनी पोलिसांना ढकलून खाली पाडले.पोलिसांनी त्यांना ताबडतोब पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हुज्जत बाजी करून शर्टाची कॉलर पकडून ओढाताण केली यात पोलिसांचा खिसा फाटला. त्याच वेळी बसस्थानकावर कर्तव्यावर असलेले प्रमोद महाजन व ज्ञानेश्वर भोई हे मदतीला आले. दोघा आरोपीना पोलीस स्टेशनला आणून अटक केली.अजयविरुद्ध अनेक गुन्हे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींकडे मोटारसायकलच्या डिक्कीचे लॉक तोडण्याची मास्टर की जप्त करण्यात आली. आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर