शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोर आढळले मृतावस्थेत

By admin | Updated: February 6, 2017 00:59 IST

वडाळी : एकाला ग्रामस्थाकडून मिळाले जीवदान, राष्ट्रीय पक्ष्यांची हेळसांड

वाकोद, ता जामनेर :  येथून जवळच असलेल्या वडाळी शिवारातील एका शेतालगत रविवारी सकाळी दोन मोर मृतावस्थेत आढळले. दरम्यान, एका मोराला शेतक:याच्या मदतीने जीवदान मिळाले. वडाळी शिवारातील शेतातून शेती कामानिमित्त जाणारा येथील तरुण गजानन भरत पांढरे याला शेताच्या रस्त्यावर दोन मोर मृतावस्थेत आढळले व बाजूला एक कुत्रा तिस:या मोराच्या मागे धावताना दिसला. गजानन याने कुत्र्याचा पाठलाग करून त्या मोराला वाचवले. मात्र त्या मोराच्या तोंडातून लाळ गळत होती. त्या मोराने कोणते तरी विषारी द्रव सेवन केलेले असावे, असा अंदाज करून उपचारासाठी गजानन पांढरे व गावातील काही मित्रांना घेऊन तो वाकोद येथील प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन आला. मात्र दवाखाना बंद असल्याने विशाल जोशी व काही युवकांकडे मोराला नेऊन संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या कर्मचा:यांना कळविण्यास सांगितले .या युवकांनी तत्काळ वाकोद येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गंदीगुळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता ‘मी औरंगाबादला घरी असून आमचा कर्मचारी लग्नाला आहे व डॉ.चिंचोले म्हसावद येथे राहत असल्याने तुम्ही वनविभागाशी बोलणे करा, ते बघतील, असे सांगून जबाबदारी झटकली, असा आरोप या वेळी करण्यात आला. नंतर वनपाल कानडे यांच्याशी संपर्क केला असता मी जळगावी असून, मी आमच्या कर्मचा:यांना पाठवतो म्हणून सांगितले. सांगितल्याप्रमाणे त्यांनी वनविभागाचे जीवन पाटील व कर्मचा:यांना घटनास्थळी पाठवले. परंतु तेही उशिराने वाकोद येथे पोहोचले. जिवंत असलेला मोर पुढील उपचारासाठी जामनेर येथे घेऊन गेले व मृत असलेल्या मोरांना घ्यायला येतो म्हणून निघून गेले. तोर्पयत तेथे पडलेल्या दोन मोरांचे शव तेथून गायब झाले. तेथे केवळ मोराची पिसे पडलेली आढळली. अचानक या मोरांचा मृत्यू का झाला असावा, याची कारणे शोधणे गरजेचे असून, ज्या ठिकाणी मोर मृतावस्थेत पडलेले होते ते कुत्रे घेऊन गेल्याने त्या ठिकाणी फक्त मोराचे पीस आढळले. (वार्ताहर)वाकोदसह परिसरात काही दिवसांपूर्वी असाच एक मोर बसस्थानक परिसरात काही लोकांनी जखमी अवस्थेत पाहिला होता. या मोरालादेखील वनविभागाशी बोलून युवकांनी जीवदान दिले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.वडाळी गावातील शेतामध्ये कामासाठी जात असताना या वेळी मला दोन मोर मृतावस्थेत, तर एक लाळ गाळत असताना दिसला. लागलीच काही युवकांना ही हकिकत सांगितली व या मोराला प्रथमोपचारासाठी वाकोद गावी पाठवले.-गजानन पांढरे, शेतकरी, वडाळी