शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

खान्देशातील दोन महाविद्यालयांनीच पूर्ण केले ‘नॅक’ मूल्यांकनाचे तीसरे सर्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 21:50 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत ८१ महाविद्यालयांनी ‘नॅक’मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले आहे. ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ २ महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे८१ महाविद्यालयांनी पूर्ण केले नॅक मूल्यांकनाचे पहिले सर्कल५५ महाविद्यालयांनी पूर्ण केले दोन सर्कलग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम

आॅनलाईन लोकमत

अजय पाटीलजळगाव-दि.१०-उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत ८१ महाविद्यालयांनी ‘नॅक’मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले आहे. ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ २ महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महाविद्यालयांना शासनाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर ५ वर्षात ‘नॅक’कडून महाविद्यालयांचे मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. राष्टÑीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नॅक) या संस्थेकडून महाविद्यालयांची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया सुविधा, वर्षभर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम याव्दारे महाविद्यालयांना मानांकन दिले जाते. मानांकनानुसार महाविद्यालयांना शासनाकडून अनुदान दिले जाते. खान्देशात महाविद्यालयांना नॅकची तपासणी करून घेण्याबाबत सहसंचालकांकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार महाविद्यालयांमध्ये नॅक समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयांची तपासणी पूर्ण केलीहोती.

२ महाविद्यालयांनी अद्याप केले नाही मूल्यांकनखान्देशातील ८३ पैकी ८१ अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले असले तरी अद्याप २ महाविद्यालयांनी नॅकचे पहिले सर्कल देखील पूर्ण केलेले नाही. यामध्ये धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील पी.बी.बागल महाविद्यालय व अक्कलकुवा येथील रुरल महाविद्यालयाचा समावेशअसल्याचीमाहितीडॉ.तुपेयांनीदिली.

५५ महाविद्यालयांनी पूर्ण केले दोन सर्कलप्रत्येक महाविद्यालयाला नॅक मूल्यांकन तपासणी समितीकडून तीन सर्कल पूर्ण करून घ्यायवयाचे असतात. खान्देशातील ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे सर्कल पूर्ण केले असून, त्याआधारावर महाविद्यालयांना मूल्यांकन देण्यात आले आहे.२८ महाविद्यालयांनी अद्याप दुसरे सर्कल पूर्ण केलेले नाही. तर केवळ दोन महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले आहे. यामध्ये भुसावळ येथील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाने २०१५ मध्ये सर्कल पूर्ण केले. तर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाने गेल्याच महिन्यात हे सर्कल पूर्ण करून ‘ए प्लस’ चे मानांकन प्राप्त केलेआहे.

ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम१.‘नॅक’ समितीकडून महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणी केल्यानंतर अ किंवा ब मानांकन मिळविणाºया महाविद्यालयांमध्ये शहरी भागातील महाविद्यालयांचा समावेश मुख्यत्वेकरून आहे. नॅकचे मानांकन ठरविताना महाविद्यालयाकडून दिल्या जाणाºया सुविधा पाहताना ग्रामीण भागातील महाविद्यालय व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम आहे.

२. यामुळे ग्र्रामीण भागातील महाविद्यालये नामांकन मिळविण्यास कमी पडतात अशी तक्रार काही महाविद्यालयांकडून होत आहे. तपासणी करत असताना ज्या महाविद्यालयात इतर राज्यातील किंवा परदेशातील शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची माहिती घेतली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील महाविद्यालय कमी पडत असल्याची तक्रार ग्रामीण भाागातील महाविद्यालयांची आहे.

कोट..आतापर्यंत २ महाविद्यालयांनी नॅक समितीकडून करण्यात येणाºया तपासणीचे तिसरे सर्कल पूर्ण केले आहे. लवकरच तीन सर्कल पूर्ण करणाºया महाविद्यालयांची संख्या महिनाभरात वाढेल. तसेच ज्या दोन महाविद्यालयांनी अद्याप नॅकचे पहिले सर्कल पूर्ण केले नाही. त्या महाविद्यालयांमध्ये देखील लवकरच नॅक समितीकडून तपासणी केली जाणार आहे. नॅक मूल्यांकन हे महाविद्यालयांना बंधनकारक आहे.-डॉ.केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग