शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात महामार्गावर आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:08 IST

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देचौपदरीकरण कामावरील दोन तरुण सुरक्षारक्षकांना चिरडलेरात्री झोपलेले असताना वाहन गेले डोक्यावरूनडोक्याचा झाला अक्षरश: चेंदामेंदामयत दोघे चुलत आत्येभाऊ होतेघटनास्थळाजवळच असलेल्या या तरुणांच्या मोटारसायकलचेही नुकसानसकाळी घटना उघडकीस आली तेव्हा घटनास्थळी झाली प्रचंड गर्दी

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावर खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेतकंपनीने सुरक्षा व्यवस्थेकडे डोळेझाक केल्याने तरुणांना जीव गमवावे लागल्याचा आक्षेप घेत नातेवाईकांनी अज्ञात वाहचालकासह चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. दोघा युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जोपर्यंत संबंधी कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे, तर दोन तरुणांच्या अपघाती निधनाने शहर हळहळले आहे.पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेत तर दोघे चुलत आत्ये भाऊ आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून ते ब्ल्यू स्टार सेक्युरिटीपूर्वी मॅनेजमेंट या कंपनीत सुरक्षगार्ड म्हणून काम करीत होते. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी चौपदरीकरण महामार्गावर पॉईंट क्रमांक ७० येथे डिव्हायडर मशीन येथे होती. ते झोपले असताना मध्यरात्री ते पहाटे दरम्यान अज्ञात वाहन दोघ तरुणांच्या डोक्यावर वरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा व चेहºयाचा अक्षरश: चेंदामेंदा केला आणि ते जागीच गतप्राण झाले होते. जवळच उभ्या असलेल्या या तरुणांच्या मोटरसायकलचेही नुकसान झाले. सकाळी घटना उघडकीस आल्याने घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.कंपनीच्या वाहनाने चिरडल्याचा संशयदरम्यान, ही घटना खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. याठिकाणी कोणतेही वळण रस्त्याचे फलक नव्हते. तसेच या ठिकाणी रस्त्याचे काम करणाºया वाहनांची रात्री वर्दळ असते. त्यामुळे कंपनीच्याच डंपरने हा अपघात घडला असावा, असा संशय मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. कंपनीच्या अज्ञात वाहनासह अज्ञात चालक आणि कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाहीतरुणांची ड्युटी असलेल्या ठिकाणी सुरक्षा फलक लावणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नाही. घटनास्थळाकडे वाहतूक करणारी वाहने जाण्याचा अधिकतर संबंध येत नाही. या भागात फक्त रस्त्यावर काम करणारी अवजड वाहने रहदारी करतात. त्यामुळे कंपनीच्या वाहनांवर संशय आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत तरुणांचे शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकानी घेतली असून, उपजिल्हा रुग्णालयात नातवाईकांचा जमाव थांबून आहे.

टॅग्स :AccidentअपघातMuktainagarमुक्ताईनगर