जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथील शरद देविदास शेळके (२७) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शरदचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील शरद देविदास शेळके या युवकाचे दोन महिन्यांपूर्वीच जळगाव येथे ८ मे रोजी सागर पार्कवर झालेल्या विवाह सोहळ््यात लग्न झाले होते. तो गोलाणी मार्केटमधील एका दुकानात मोबाईल दुुरुस्तीचे काम करुन उदरनिर्वाह करीत असे. दोन दिवसांपूर्वी शरदची पत्नी माहेरी गेलेली होती. गुुरुवारी त्याची आई शेतात गेलेली असताना घरात कोणीच नसल्याने शरदने छताला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आई घरी आली त्या वेळी तिला हे मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेच आढळून आला. त्या वेळी शरदच्या आईने हंबरडा फोडला. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत शरदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.शरदच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. शरदचा एक भाऊ दीपक हा बांधकाम करतो तर भरत हा दुसरा भाऊ कंपनीत कामाला आहे. दोन बहिणी व हे तिघेही भाऊ विवाहीत असून सर्व भाऊ वेगवेगळे राहतात.
दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या चिंचोली येथील तरुणाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:25 IST
गळफास घेवून संपविली जीवनयात्रा
दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या चिंचोली येथील तरुणाने केली आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण समजू शकले नाहीपत्नी माहेरी गेलेली