पंढरीनाथ गवळी/ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.4- जळगाव येथील भाजपाचे आमदार सुरेश दामू भोळे यांचे सुमारे एक लाख 20 हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल चोरटय़ांनी लांबविले. ही घटना मंगळवारी पहाटे 1 वाजेच्या सुमारास 11057 डाऊन मुंबई- अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये ठाणे-कसारा दरम्यान वातानुकुलित डब्यांमध्ये घडली. भुसावळ येथील लोहमार्ग पोलिसात भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश उपाध्याय व मयूर कोल्हे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार सुरेश भोळे हे पठाणकोट एक्स्प्रेसच्या ए-1 वातानुकुलित डब्यातून बर्थ क्रमांक 25-26 वरुन मुंबईहून -जळगाव असा प्रवास करीत असताना ठाणे-कसारा दरम्यान, चोरटय़ांनी ते झोपले असताना त्यांच्या जवळील दोन मोबाईल लांबविले. याबाबत भुसावळ येथे गुन्हा दाखल झाला आहे. तो ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्याच महिन्यात विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांचा देखील मोबाईल त्यांची ङोड सुरक्षा भेदून लांबविण्यात आले होते. त्यानंतर आज आमदार भोळे यांचे दोन मोबाईल लांबविण्यात आले.