शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी आठवड्यातून दोन बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 11:43 IST

बँक अधिकारी, लेखापरीक्षकांचीही राहणार उपस्थिती

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समितींची स्थापना करण्यात आली आहे. समितीला आता प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी बैठका घ्याव्या लागणार आहेत.दरम्यान, तालुकास्तरीय समितीची पहिली बैठक १८ जुलै रोजी घेण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले होते. मात्र अद्याप या संदर्भातील अजेंडा संबंधित यंत्रणांपर्यत पोहचू शकलेला नसल्याने आता सोमवार, २२ रोजीच पहिली बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अनेकांचे तक्रारी असल्याने त्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने तालुकास्तरीय समितींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १५ जुलै रोजी आयुक्त कायार्लायाने पत्र देऊन या समित्यांनी करावयाच्या कामांबाबत सूचित केले आहे. समितीने प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बैठका घेऊन प्राप्त तक्रारींचे निवारण करावयाचे आहे. शासन निर्णय कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावणे, कार्यवाहीचा अहवाल त्याच दिवशी सादर करण्याविषयी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा अग्रणी प्रबंधक व कार्यकारी संचालकांनीही आपल्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना समितीच्या प्रत्येक होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहावे लागणार आहे.जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी त्यांच्या तालुका स्तरावरील लेखापरीक्षकांना सभेस आवश्यक माहितीसह उपस्थितीत राहण्या विषयी सूचित केले आहे. तसेच जिल्हा देखरेख सहकारी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विका संस्थेच्या गटसचिवाच्या सूचित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. बँक अधिकारी, सहकारी संस्थांना अजेंडा पाठविण्याची प्रकिया सुरू आहे.प्राधान्याने कामे कराछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत शेतकºयाच्या लाभाशी व कर्जवाटपाशी संबंधित हा विषय असल्यामुळे या कामी प्रथम प्राधान्य देऊन कार्यवाही मुदतीत पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश सहकार विभागाने सहाय्यक निबंधकांना दिले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव