शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के बांधकामाच्या सक्तीने १४०० उद्योगांना बसणार भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:54 IST

मंदीतील लघु उद्योगांवर नवीन संकट

जळगाव : उद्योगासाठी असलेल्या एकूण जागेपैकी ४० टक्के जागेवर बांधकाम करण्याची सक्ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केल्याने त्याचा मोठा फटका लघू व मध्यम उद्योजकांना बसणार असून या निर्णयामुळे जळगावातील एक हजार ४०० उद्योगांना भुर्दंड बसणार आहे. दरम्यान, या संदर्भात उद्योजकांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली असून या बाबत फेर विचार करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे याकडे आता या उद्योजकांचे लक्ष लागलेले आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या एकूण जागेच्या ४० टक्के बांधकाम करण्याची सक्ती केली आहे. पूर्वी यासाठी २० टक्के बांधकाम करणे गरजे होते. मात्र आता या नवीन निर्णयानुसार बांधकाम थेट दुप्पट करावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील लघु व मध्यम उद्योजकांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असल्याने त्याला राज्यातील सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे.अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी पडूनएसईझेड अथवा अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी तशाच पडून आहे.त्याकडे दुर्लक्ष करीत लघु व मध्यम उद्योगांना असे वेठीस धरणे हा कोणता न्याय आहे, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. पडून असलेल्या त्या जमिनी जर वापरात येत नसतील तर त्या जमिनी बाबत प्राधान्याने विचार करावा व सध्याच्या उद्योजकांना हा नवीन निर्णय अडचणीचा ठरणार असल्याने हे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, या निर्णयाला राज्यातील सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या माध्यमातून विरोध करीत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली व हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्या वेळी या निर्णयास स्थगिती देऊ व पुढील सुधारीत निर्णय घेताना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले असल्याची माहिती जळगाव इंडस्ट्रीज् असोसिएशनचे सचिव सचिन चोरडिया यांनी दिली.मागण्यांकडे दुर्लक्ष, उद्योगांपुढे नवीन संकटशेतीनंतर अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेले लघु उद्योग क्षेत्र सध्या विविध अडचणीतून जात आहे. वीज दर वाढीने हे उद्योजक चिंतीत असून वीज बिल माफीसह व्याजदरात सवलत देणे, विशेष योजनेंतर्गत सवलती देणे अशा मागण्या लघु उद्योजकांच्या असून त्यासाठी पाठपुरावा केला तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे व दुसरीकडे आता वाढीव बांधकामाच्या संकटाने चिंता असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.जळगावात अधिक फटकाजळगावातील अगोदरच उद्योगांची बिकट स्थिती असून डाळ उद्योग, प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून कसेबसे औद्योगिक क्षेत्र सुरू आहे. त्यात येथे लघु उद्योगांची संख्या अधिक म्हणजेज जवळपास एक हजार ४०० असून एमआयडीच्या या निर्णयाने जळगावात मोठा फटका बसणार आहे.नवीन गुंतवणूक करणे अशक्यराज्यातील छोट्या व मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना सुद्धा या निर्णयामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून उद्योगांची सध्याची परिस्थिती पाहता नवीन गुंतवणूक करणे उद्योगाला शक्य नाही. तसेच ज्या जमिनीवर कोणताही उद्योग उभारला गेला नाही अशा जमिनी शासनाने परत घ्यावेत, ज्या ठिकाणी लहान अथवा मोठ्या स्वरूपात उद्योग प्रत्यक्षात कार्यरत आहेत, अशा उद्योगांना हा नियम लावणे अयोग्य असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.उद्योगाच्या एकूण जागेपैकी ४० टक्के बांधकामासंदर्भातील एमआयडीसीच्या निर्णयामुळे जळगावातील जवळपास एक हजार ४०० उद्योगांना झळ बसणार आहे. आधीच उद्योगांची बिकट स्थिती असल्याने हे नवीन संकट ओढावले आहे. या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- सचिन चोरडिया, सचिव, जळगाव इंडस्ट्रीज् असोसिएशनएसईझेड अथवा अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी जर वापरात येत नसतील तर त्या जमिनी बाबत प्राधान्याने विचार झाला पाहिजे. सध्याच्या उद्योजकांना एमआयडीसीचा हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.- ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स

टॅग्स :Jalgaonजळगाव