शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सायगाव येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:11 IST

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरफोड्या करीत दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

ठळक मुद्देएक संशयीत ताब्यातदोन महिन्यात तीन घरफोड्या झाल्याने घबराट

सायगाव ता. चाळीसगाव : सायगाव येथे रविवारी मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी घरफोडी होऊन चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी श्वानपथकाला पाचारण केले होते. तर संशयावरून एकास ताब्यात घेतले आहे.पहिल्या चोरीचा तपास लागत नाही तोच...सायगांव येथे २ महिन्यापूर्वी विठाबाई दगा साबळे यांच्या घरी चोरी होऊन सुमारे अडीच लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला होता. त्या चोरीचा तपास अजुनही लागला नसताना आणि पोलिस चोरट्यांच्या शोधात फिरत असतांनाच रविवारी मध्यरात्री नंतर अर्थात सोमवारी पहाटे एक ते दिड वाजेदरम्यान दीपक मधुकर वेळे यांच्या घरी पोलिसांनी डल्ला मारला. वेळे हे आपल्या बाहेरगावी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी गेले असतांना त्यांच्या मागे चोरटयांनी रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने असे मिळून अंदाजे १ लाख २५००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.एवढेच नव्हे तर त्यांच्या शेजारी राहत असलेले इसेखाँ महमद खाँ पठाण यांच्या घरीही त्यांनी हात साफ केला. पठाण हे झोपेत असतांना त्यांच्या डोक्याजवळ ठेवलेल्या पँटमधून साडेतीन हजार व शेजारी असलेली पेटी उचलून नेली. आणि त्यामधील पाच हजार रुपये रोख काढुन ती पेटी छाजेडनगरमध्ये फेकून पोबारा केला. एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्यामुळे सायगांव येथे भीतीचे वातावरण पसरले आहे .श्वानपथक, ठसेतज्ञ रिकाम्या हाताने परतलेसायगांव येथे झालेल्या घरफोड्यांची माहिती मिळताच मेहुणबारे येथील एपीआय जयपाल हिरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, जळगाव येथून हस्त ठसेतज्ञांना आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तथापि चोरट्यांचा काहीही माग लागू शकला नाही. ज्या ठिकाणी चोरांनी चोरी केली त्या ठिकाणी त्यांना चार्र्जींगची बॅटरी सापडली त्यामुळे काही धागेदोरे हाती लागतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, सायगांव येथील मोलमजुरी करणारा वाल्मिक बारकू पाटील याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे .