बोदवड, जि.जळगाव : दुचाकीच्या धडकेने येथील रेल्वेगेट तुटल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शनिवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील बोदवड रेल्वेस्थानकाजवळचे फाटक रेल्वे येत असल्याने बंद होत होते. तेव्हा त्यात भरधाव दुचाकी गेटमधून जात होती. त्याच वेळी दुचाकीची धडक गेटला लागली. त्यात रेल्वेगेट तुटले व दुचाकीस्वारही फेकले गेले. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले.रेल्वेगेट तुटल्याने रेल्वेकडून कारवाई होणार या भीतीमुळे दुचाकीधारकांनी घटनास्थळावरून दुचाकी उचलून पळ काढला. मात्र या घटनेने मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती.बोदवड रेल्वेगेट तुटल्याने रेल्वे कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
बोदवड येथे रेल्वेगेट तुटल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 19:00 IST
बोदवड , जि.जळगाव : दुचाकीच्या धडकेने येथील रेल्वेगेट तुटल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शनिवारी दुपारी अडीच ते ...
बोदवड येथे रेल्वेगेट तुटल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा
ठळक मुद्देदुचाकीस्वाराच्या धडकेने घडली दुर्घटनारेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत केली वाहतूक पूर्ववत