शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात जळगावच्या किमान तापमानात ४ अंशाची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:28 IST

ओखी चक्रीवादळामुळे शहराचा वातावरणात मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, दोन दिवसातच शहराच्या किमान तापमानात तब्बल ४ अंशाची वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे ओखी वादळाचा परिणाम सलग दुस-या दिवशीही ढगाळ वातावरणगुरुवारी ही पावसाची शक्यता

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.६-ओखी चक्रीवादळामुळे शहराचा वातावरणात मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, दोन दिवसातच शहराच्या किमान तापमानात तब्बल ४ अंशाची वाढ झाली आहे. सोमवारी १३ अंशावर असलेले शहराचे किमान तापमान बुधवारी १७ अंशावर आले होते. तसेच बुधवारी देखील शहरात दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले.

ओखी वादळामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी, जळगाव जिल्ह्यात काही भागांमध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची नोंद झाली. बुधवारी देखील जळगाव शहरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तसेच किमान तापमानात जरी वाढ झाली असली तरी मात्र कमाल तापमानात दोन अंशाची घट झाल्याने दिवसभर वातावरणात गारवा कायम होता. बुधवारी जळगावचे कमाल तापमान २७ अंश इतके होते. तसेच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी वाºयांचा वेग मंदावला होता. मंगळवारी ताशी १८ किमी वेगाने वाहणाºया वाºयांचा वेग बुधवारी १० ते १२ किमी होता. रब्बीच्या पिकांना ओखी वादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता असून, दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहिल्यास हरभरा पिकावर कीड पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत.

गुरुवारी ही पावसाची शक्यतागुरुवारी ओखी चक्रीवादळाची तीव्रता देखील कमी होणे अपेक्षित आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने प्रवास करणार असल्याने महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर पावसाची गुरुवारी देखील शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, जळगाव येथे हलका पाउस अपेक्षित आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा देखील अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.