शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निगेटीव्ह म्हणून सोडले दोन दिवसांनी पॉझिटीव्ह म्हणून घ्यायला आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:50 IST

जोशी कॉलनीत गोंधळ

जळगाव : शहरातील जोशी कॉलनीतील एका महिलेला अधिग्रहीत रुग्णालयातून निगेटीव्ह असल्याचे सांगत घरी सोडण्यात आले़ मात्र, दोन दिवसांनी सकाळी सकाळी महापालिकेचे पथक दारात धडकले व आपण पॉझिटीव्ह आहात, आमच्याबरोबर सर्वांना यायला लागले असे सांगू लागले व सर्वांचेच धाबे दणाणले़ कारण घरात महिलेच्या वडिलांचा दशक्रिया विधी सुरू होता व या कार्यक्रमाला महिलेच्या संपर्कात तीस ते पस्तीस नातेवाईक आले होते़मिळालेल्या माहितीनुसार जोशी कॉलनीतील ४५ वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास होत होता़ म्हणून या महिलेचे नातेवाईक महिलेला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते़त्या ठिकाणी डॉक्टरांनी शंका व्यक्त करीत महिलेला कोविडसाठी अधिग्रही त रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले़ २९ जून रोजी या महिलेला त्या ठिकाणी दाखल करून त्यांचे नमुने घेण्यात आले़ २ जुलै रोजी अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगत थेट त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले़महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने अन्य उपचारांची मागणी नातेवाईकांनी केली मात्र, अहवाल निगेटीव्ह असून घरीच उपचार घ्या, असे रुग्णालयातून सांगण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे़ दरम्यान, अहवाल निगेटीव्ह असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला़ यानंतर काही नातेवाईक भेटायलाही आले़सायंकाळी या महिलेसह संपर्कातील दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेचा पहिला अहवाल हा इनकन्क्ल्युझिव्ह अर्थात अस्पष्ट होता़ अशा स्थितीत या महिलेला होम क्वारंटाईनच्या सूचना देत डिस्चार्ज करण्यात आले होते़ मात्र, या महिलेचा अहवालनंतर पॉझिटीव्ह आला़ असे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे़सर्वांना धक्का, अन् गोंधळ उडालामहिलेच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ४ जुलै रोजी त्यांचा दशक्रिया विधी होता़ यासाठी ३० ते ३५ लोक जमले होते़ निगेटीव्ह असल्याने या महिलाही त्यांच्यात मिसळल्या होत्या़ अशातच सकाळी दहा वाजेच्या सुमारास महापालिकेचे पथक आले व तुमचा रिर्पोट पॉझिटीव्ह आहे. तुम्हाला आमच्या सोबत यावे लागेल असे ते म्हणाले व सर्वांनाच धक्का बसला़ यावेळी बराच वेळ गोंधळ झाला होता़ अखेर महापालिकेचे पथक तसेच निघून गेले़ नंतर परिसरातील सर्वांनी समजूत काढली़ मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत महापलिकेच्या पथकाचा पत्ता नव्हता़

टॅग्स :Jalgaonजळगाव