शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
4
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
5
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
6
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
7
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
8
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
9
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
10
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
11
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
12
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
13
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
14
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
15
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
16
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
17
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
18
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
19
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!

जळगावात दोन चॉपर व एक तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:17 IST

पाच जणांना अटक

ठळक मुद्देएक अल्पवयीन, एक संशयित फरारआव्हाणे शिवारात सत्यम पार्कजवळ एका जणाकडे तलवार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १३ - पांझरापोळ परिसरातील पानटपरीवर चार तलवारी व बस स्थानकात एक गावठी पिस्तुल सापडल्याची घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा शिव कॉलनीत तीन तरुणांकडे तर अयोध्या नगरात एका जणाकडे चॉपर आढळून आला तर आव्हाणे शिवारात सत्यम पार्कजवळ एका जणाकडे तलवार आढळून आली. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून अनुक्रमे रामानंद नगर व तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशुतोष अनिल सोनार (वय १९, रा.पहुर, ता.जामनेर), शुभम विकास अत्तरदे (वय १९, रा.शंकरराव नगर, जळगाव) व एक अल्पवयीन अशा तिघांना रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी दुपारी चार वाजता पकडले. उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, प्रदीप चौधरी, रवींद्र कापडणे, शरद पाटील व सागर तडवी यांचे पथक गस्तीवर होते. संशयावरुन तिघांची चौकशी केली असता आशुतोष सोनार याच्या कमरेला चॉपर आढळून आला.स्वप्नील सखाराम सोनवणे (रा.जैनाबाद, जळगाव) हा फरार झाला.अयोध्या नगरात चॉपर पकडलाअयोध्या नगरात देशमुख डेअरीजवळ संदीप रमेश पवार (वय ३१, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यालाही एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले. उपनिरीक्षक रोहन खंडागळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, अतुल पाटील, विजय पाटील व मनोज सुरवाडे यांच्या पथकाने संदीप याला चॉपरसह अटक केली.गेल्या काही दिवसांपासून शहरात चाकू व तलवार हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तीन महिन्यांवर मनपाची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. आणखी काही दिवस ही मोहिम शहरात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.आव्हाणे शिवारात आढळली तलवार

आव्हाणे शिवारात सत्यम पार्क परिसरात एक तरुण तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे जितेंद्र सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सहायक निरीक्षक सचिन बागुल, राजेंद्र बोरसे,जितेंद्र सानेवणे, पोपट सोनार व विजय पाटील यांचे पथक रवाना केले होते. या पथकाला अनिल एकनाथ सपकाळे (वय २९ रा.निमखेडी, ता.जळगाव) हा तरुण आढळून आला.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव