भुसावळ : शहरातील भांड्याच्या दुकानातून ४७ हजार किमतींची भांडी चोरून नेली होती. या प्रकरणी आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (२१, रा.आठवडे बाजार भुसावळ) व आसिफ शहा शरीफ शहा (३२, रा.काजी प्लॉट भुसावळ) या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र शंकर मुळे यांच्या मालकीचे आठवडे बाजारात भांड्यांचे दुकान आहे. चोरट्यांनी ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान हे दुकान फोडून त्यातील ४७ हजार रुपये किमतींची भांडी चोरली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. बाजारपेठ डीबी शाखेला हा गुन्हा संशयित आकाश व आसीफ शहाने केल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, १६ हजार रुपये किमतीचे भांडी काढून दिली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नेव्हिल बाटली, रवींद्र बिऱ्हाडे, नाईक विकाससातदिवे, रमण सुरळकर, कॉ.चेतन ढाकणे, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली. अधिक तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.