शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील बॅँक फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:23 IST

युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून बॅँक आॅफ महाराष्टच्या नवी पेठ शाखेत ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात शहर पोलिसांनी गोपाल गोविंदराव वानखेडे (वय ४५) व सुनील केशवराव पंडागळे (वय ३८) दोन्ही रा.निमगाव, ता.नांदूरा, जि.बुलढाणा या दोघांना रविवारी निमगाव, ता.नांदूरा येथून अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून केली फसवणूक४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक  १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल

 आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून बॅँक आॅफ महाराष्ट च्या नवी पेठ शाखेत ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात शहर पोलिसांनी गोपाल गोविंदराव वानखेडे (वय ४५) व सुनील केशवराव पंडागळे (वय ३८) दोन्ही रा.निमगाव, ता.नांदूरा, जि.बुलढाणा या दोघांना रविवारी निमगाव, ता.नांदूरा येथून अटक करण्यात आली.नवी पेठेतील बॅँक आॅफ महाराष्ट मध्ये २७ डिसेंबर २०१६ ते १८ जानेवारी २०१७ या कालावधीत १३ जणांनी युपीआय या अ‍ॅपच्या माध्यमातून ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक केली होती. शाखा व्यवस्थापक छाया गिरीश भगूरकर यांच्या फिर्यादीवरु शहर पोलिसात १२ एप्रिल २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वी राजेश जनार्दन बुडुखले उर्फ सोनी (रा.निमगाव, ता.नांदूरा) याला अटक करण्यात आली आहे. तो १४ माचपर्यंत न्यायालयीत कोठडीत आहे. तपासाधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, हेडकॉन्स्टेबल संजय भांडारक, रमन गिते व माधव तरकुटे यांच्या पथकाने या दोघांना त्यांच्या मुळ गावी जावून अटक केली.दरम्यान, दोघांना न्या.व्ही.एच.खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.