शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

निलगायींची शिकार करताना धुळे येथील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 18:01 IST

जामनेर तालुक्यातील कारवाई : आरोपींचे जामनेर कनेक्शन असण्याची शक्यता?

जामनेर : तालुक्यातील नागणचौकी गावाजवळ असलेल्या जंगलात नीलगायींची शिकार करताना धुळे जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळील जीपमध्ये (क्र.एमएच-०२-जे-९७६०)े नीलगायीचे मांस व दोन रायफल, काही जिवंत काडतुस सापडले असून यातील दोन जण फरार झाले आहेत. ही कारवाई सोमवारी सकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. मेहमूद महमद अबिद (४५), अन्सारीसोद मोहमद अबिद (३२) दोघे रा. वल्डीपुरा, धुळे यांना पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील नागण चौकी गावालगत जंगल असून जंगलात मोठ्या प्रमाणावर नीलगाय, हरीण आदी प्राणी आहेत.धुळे येथील चार व्यक्ती शिकार करुन या जंगलातून निघत असताना त्यांची जीप जंगला जवळच्या चारीत फसली. या दरम्यान गावातील तीन तरुण सागर नाईक, नामदेव घोर, आकाश कोळी हे फिरायला निघाले होते. रस्त्यावर अडकलेली जीप काढण्यासाठी गावातील या तरुणांनी गाडी बाहेर काढण्यास मदत केली. त्या तरुणांनी त्यांना विचारपूस केली असता आम्ही बाहेरगावचे आहे व आमचा एक जोडीदार गावात गाडी काढण्यासाठी ट्रक्टर आण्यासाठी गेला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी तरुणांना त्यांच्यावर संशय आला असता त्यांनी त्यांची गाडी पुन्हा फसवून टाकली व चौकशी केली असता त्यांच्याजवळ दोन रायफल व गाडीत नीलगायींचे मांस असल्याचे दिसले. गावातील सागर नाईक यांनी त्यांच्याकडून एक रायफल हिसकावली व फायर करताच त्यांनी भरधाव वेगात गाडी काढली व ते नागण चौकी गावाकडे निघाले. मात्र काही ग्रामस्थांना पाहून ते पुन्हा जामनेरकडे वळले. गाडी भरधाव असतानाच एका तरुणाने चालकाला दगड मारल्याने ती पलटी झाली.दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटिल, सचिन पाटील, राहुल पाटील, अमोल घुगे, जयसिंग राठोड यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले व दोन आरोपी हर्षद (चालक रा.धुळे), उस्मान शाह (रा. नाचनखेडा, ता.जामनेर) हे पळून गेले. पोलिसांनी आरोपीकडून एक जिप्सी गाडी, दोन रायफल, दोन नीलगायींचे मांस, २६ (२.२) चे जीवंत कारतुसे, १३(३०६) काडतूस असा एकूण तीन लाख ४५ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला आहे. घटनास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल काळे, वनरक्षक टी.एन. घरजाळे, वैशाली कुलकर्णी, चरणदास चव्हाण, कल्याणसिंग पाटील यांनी पंचनामा केला. तर पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. पी.एल.राणे, पशुधन वैद्यकीय अधिकार डॉ.एस. एस.व्यव्हारे यांनी मांसाचे नमूने घेतले.गावातील तरुणांचे मोठे सहकार्यझालेला प्रकार सोडून देण्याची विनवणी करीत आरोपींनी गावातील तरुणांनी पैशाचे आमिष दाखविले. मात्र पैसे न घेता एका तरुणाने रायफल हिसकावून घेत फयरिंग केली. मोठ्या हिमतीने मुकाबला करुन पकडण्यात योगदान दिले.अटक केलेल्या आरोपीवर १० वर्षांपूर्वी याच प्रकारचा गुन्हा जामनेर पोलिसात दाखल आहे. हे शिकारी नीलगाय, काळवीटांच्च्या शिकारीसाठी आले होते. पोलिस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.यामधे आणखी काहींचा समावेश असण्याची व अटक झालेल्या आरोपींचे जामनेर कनेक्शन असण्याची शक्यता असून पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. कटर मशीनने हे मास कापल्याचे निदर्शनास आले असून ते जंगलात फेकून दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.