शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बाबतीत बारा महिने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:53 IST

विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़

आसोदा हे गाव जळगावच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे़ मात्र, येथे विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़ वर्षानुवर्षे झाली मात्र, आजपर्यंत एकही ग्रामपंचायत ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ शकलेली नाही ही मोठी शोकांतिका आहे़ उन्हाळ्यात दूषित, पावसाळ्यात गढूळ, हिवाळ्यात टंचाई, असे बाराही महिने पाण्याच्या अडचणींचा ग्रामस्थांना सामना करावा लागतो़ कोणालाच याचे सोयरसुतक नाही़ कोणीही लक्ष द्यायला तयार नाही़ एवढ्या मोठ्या गावासाठी अगदी छोटी पाणीपुरवठा योजना निवडण्यात आल्याने गाव पुन्हा ५० वर्ष मागे गेलेले आहे़ प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची ग्रामस्थांना आता किव येतेय की, ते पाणी टंचाईवर काहीही करू शकत नाही. उन्हाळ्यात जनस्त्रोत आटून पाणी टंचाईची समस्या उद्भवणे हे नैसर्गिक आहे़ पाऊस कमी पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणे हे ही नैसर्गिक आहे़ मात्र, गावा शेजारी पाणी असताना ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचा प्रकार म्हणजे भयावह आहे़ स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव, कुठलेली नियंत्रण नसणे, याची प्रचिती म्हणजे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण होय़ अनेक भागात आजही अशा कृत्रिम पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ पाणी टंचाईचे फटके अगदी सर्वांनाच सहन करावे लागत आहे़ यात वृद्ध व दिव्यांगांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात़ टंचाईबाबत नियोजन नसल्यामुळे पाण्यासाठीची ही वणवण अधिकच वाढली आहे़ अशा स्थितीत स्वच्छ भारत अभियानाचाही गावात बोजवारा उडाला आहे़ कारण पाण्याअभावी शौचालयांचा वापर हा पूर्णत: थांबलेला आहे़ हा मुद्दाही गंभीर आहे, मात्र त्या गांभिर्याने गावाच्या या समस्येकडे बघायला कोणीही तयार नाही़-किशोर चौधरी, पाणी टंचाई निवारण समिती समन्वयक

टॅग्स :Jalgaonजळगाव