शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:34 IST

सुवर्ण खरेदीसाठी साधला मुहूर्त

ठळक मुद्दे११०० दुचाकी तर ३०० चारचाकींची विक्रीएलईडीला सर्वाधिक मागणी

जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला तर कापड बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री होऊन दिवाळीपूर्वीच दसºयाला सुमारे १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज विविध क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविला.सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साहजळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. पितृपक्षामुळे उलाढाल कमी झाली असताना सोने खरेदीत मंदीचे वातावरण होते. त्यानंतर नवरात्र व आता विजयादशमीला शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. शहरातील १५०च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले. एरव्ही नवरात्रात सुवर्ण बाजारात खरेदी वाढतेच. त्या प्रमाणे यंदाही गेल्या आठवड्यापासून सराफ बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. या दिवसात भाव कितीही असले तरी ग्राहक सोन्याची खरेदी करतातच.गेल्या आठवड्यापासून सोन्याचे दर ३२ हजाराच्यावर गेले आहे. तरीदेखील सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम होता. ऐन दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा मानस असलेल्या ग्राहकांचा मोठा उत्साह बाजारात दिसून आला.८ कोटींच्या दुचाकींची विक्रीविजयदशमीचा मुहूर्त साधण्यासाठी नोकरवर्गाकडून दुचाकी व चारचाकीची खरेदीसाठी बुकिंग करण्यात आली होती. शहरातील दुचाकीच्या एकाच दालनात दसºयाच्या मुहूर्तावर ४७८ दुचाकींची विक्री झाली. या सोबतच इतर दालनांमध्ये मिळून साधारणत: ११०० दुचाकींची विक्री झाली. यातून साधारण ८ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.३०० चारचाकींची विक्रीदुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत राहिली. चारचाकीच्या एकाच शोरुमध्ये १७० तर शहरात एकूण ३०० चारचाकींची विक्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. यात १८ ते २० कोटींची उलाढाल झाली.एलईडीला सर्वाधिक मागणीइलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारालादेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कधी नव्हे एवढ्या प्रमाणात एकाच दिवसात ७०० इलेक्टॉनिक्स वस्तूंची विक्री झाली. यात एलईडीला सर्वात जास्त मागणी होती. त्याखालोखाल फ्रीज, वॉशिंगमशीनची विक्री झाली. सकाळपासून ग्राहकांची खरेदी करण्यासाठी गर्दी सुरू झाली होती, अस ेविक्रेत्यांकडून सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये ४ कोटींच्यावर उलाढाल झाली.घर खरेदीतही ४० कोटींची उलाढालविजयादशमीच्या मुहूर्तावर जवळपास २५० जणांनी गृहप्रवेश केला. घर खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात होती. यासाठी कुटुंबासह अनेकजण येऊन शाळा, महाविद्यालय व इतर सोयींचा विचार करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार व घराची किंमत पाहून नवीन घराची खरेदी केली. यातून जवळपास ४० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.कापड बाजारतही उत्साहसण-उत्सव म्हटले म्हणजे प्रत्येक जण नवीन कपडे खरेदीला पसंती देत असतो. त्यानुसार विजयादशमीलादेखील मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांची खरेदी होऊन जवळपास १० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. मुहूर्ताच्या दिवशी दुपारनंतर ग्राहकांची गर्दी वाढली होती.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.घर खरेदीसाठी विविध योजनांमुळे उत्साह आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर घर खरेदीस चांगला प्रतिसाद राहिला.- श्रीराम खटोड, बांधकाम व्यावसायिकयंदा विजयादशमीला चारचाकी खरेदीसाठी मोठी उलाढाल झाली. एकाच दिवसात आमच्या दालनातून १७० चारचाकींची विक्री झाली.- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. आमच्या दालनातून विजयादशमीला एकाच दिवसात ४७८ दुचाकींची विक्री झाली.- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी असल्याचे बाजारात चित्र आहे. एिकाच दिवसात शहरात जवळपास ७०० इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री झाल्याचा अंदाज आहे.- दिनेश पाटील, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव