शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट तपासणीमुळे रेल्वे स्थानकात अवैधरित्या प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:45 IST

रेल्वे फलाटांवर अवैधरित्या प्रवेश रोखण्यासाठी व प्रवाशांमध्ये जागरुकता वाढावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनातर्फे दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर फलाट तिकिटांची तपासणी करण्यात आली. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

ठळक मुद्देफलाट तिकिटाबद्दल जागरुकता मोहीमरेल्वेच्या उत्पन्नातही भरीव वाढ

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे फलाटांवर अवैधरित्या प्रवेश रोखण्यासाठी व प्रवाशांमध्ये जागरुकता वाढावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनातर्फे दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर फलाट तिकिटांची तपासणी करण्यात आली. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.भुसावळ रेल्वे स्थानकावर देशाच्या कानाकोपऱ्यातून गाड्या ये-जा करतात. हजारोंच्या संख्येने प्रवासी स्थानकांमध्ये येत असतात. स्थानकामध्ये अवैधरित्या प्रवेश करणाऱ्यांवर आळा बसावा व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांमध्ये जागरूकता मोहीम म्हणून दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर (तिकिटिंग एरिया) फलाटांच्या तिकिटांची तपासणी मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक नीलेश बाथो, मुख्य तिकीट निरीक्षक बी.एस.महाजन, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी वसीम शेख, इम्रानखान यांच्या पथकाने शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केली. यावेळी अवैधरित्या तिकीट न काढता फलाटमध्ये प्रवेश करणाºया प्रवाशांना समजूत घालून तिकीट काढण्याच्या सूचना करण्यात आल्या.उत्पन्नात वाढगतवर्षी याच महिन्यांमध्ये पहिल्या १० दिवसात सुमारे ८०० ते ९०० फलाट तिकीट काढण्यात आले होते. हा आकडा वाढून आता १४०० ते १५०० दरम्यान गेला आहे. फलाटाच्या प्रति तिकीट मागे १० रुपये आकारले जातात. फलाट तिकीट न घेतल्यास २५० रुपये दंडाची तरतूद आहे. या मोहिमेमुळे रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.दरम्यान, फलाट तिकीट तपासणीची मोहीम सातत्याने सुरूच राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ