शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने लाभार्र्थींची होतेय अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 20:54 IST

स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशिन यंत्रणेमुळे खऱ्या गरजू लाभार्र्थींना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाºया लाभार्र्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्दे‘आधार’ असूनही लाभार्थी ‘निराधार’यावल तालुक्यातील न्हावीसह परिसरातील स्थिती

न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशिन यंत्रणेमुळे खऱ्या गरजू लाभार्र्थींना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाºया लाभार्र्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.ई-पॉस हे इंटरनेटला संलग्न असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक याची संपूर्ण माहिती पोर्टलवर उपलब्ध असून, कार्डधारकाने खरेदी केलेल्या संपूर्ण धान्याचा तपशील विभागाच्या पोर्टलवर तत्काळ येतो. परंतु धान्य घेण्यास गेलेल्या लाभार्र्थींचे ठसे उमटत नसल्या कारणाने चकरा माराव्या लागत आहे. सध्या सर्वच रेशनकार्डधारक लाभार्थीची पडताळणी सुरू आहे. परिवारातील प्रत्येक लाभार्र्थींचे ई-पॉस मशिनवर ठसे घेतले जात असून, त्यावरसुद्धा काहींचे ठसे उमटत आहेत तर काहींचे ठसे उमटत नसल्याकारणाने अडचण निर्माण होत आहे.तसेच गावातील मजुरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले लाभार्थी ठसे देण्यासाठी आले असल्याने त्यांचेसुद्धा काहींचे ठसे उमटत नसल्याकारणाने आपल्याला मिळणारे धान्य बंद तर होणार नाही ना, अशी भीती सध्या कार्डधारकांमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहे. यासाठी शासनाने पर्याय शोधण्याची गरज कार्डधारक लाभार्थीकडून मोठ्या प्रमाणात व्यक्य होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल