शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे सहकार महर्षी जे.टी.महाजन यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 18:24 IST

जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात सहकार महर्षी जीवराम तुकाराम महाजन यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देमान्यवरांनी दिला जीवनकार्याला उजाळाविद्यार्थ्यांनी सादर केली भावगीतेसर्व संचालक व पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही समाधी स्थळावर केले पुष्पार्पण

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात १० नोव्हेंबर रोजी तंत्र व वैद्यशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सहकार महर्षी जीवराम तुकाराम महाजन यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.महाविद्यालयाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याला कृषी शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, मसाका  अध्यक्ष शरद जीवराम महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, मानद सचिव विजय रघुनाथ झोपे, मानद सहसचिव मार्र्तंड गणपत भिरूड, नरेंद्र नारखेडे, प्रभाकर सोनवणे, गणेश नेहेते, लीलाधर चौधरी, शेखर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संचालक मंडळातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय.टी.आय., इंग्लिश मीडियम स्कूल व मसाकाचे सर्व संचालक व पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही समाधी स्थळावर पुष्पार्पण केले.यावेळी नीलेश राणे, अमोल भिरूड, नारायण चौधरी, डॉ.नरेंद्र कोल्हे, भानुदास चोपडे, प्रा.डॉ.व्ही.आर. पाटील , तंत्र व वैद्यकशिक्षण मंडळ सदस्य रामा परशुराम पाचपांडे, दामोदर केशव चौधरी, शशिकांत रामचंद्र चौधरी, विजयकुमार परदेशी, बी.व्ही.बोरोले, एस.एल.तळेले, बी.डी.चौधरी, आर.एन.ढाके, एस.इ. पाटील, एन.आर.झांबरे. जि.प.च्या माजी सदस्या आरती शरद महाजन, जी.पी.पाटील, सुभाष पाटील, संजय महाजन, नितीन चौधरी , बरसू रामदास नेहेते यांनी समाधी स्थळावर पुष्पार्पण करून श्रद्धाजली वाहिली.महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.नंदिनी चौधरी, उपप्राचार्य डॉ.आर.डी. पाटील, सर्व विभागप्रमुख डॉ.ए.एम.पाटील, प्रा.डॉ.एन.डी.नारखेडे, प्रा.आर.के.मालविया, प्रा.डी.ए.वारके, डॉ.डी.के.किरंगे, डीन डॉ.पी.एम.महाजन, तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.एस.झोपे, आयटीआय, प्राचार्य प्रा.प्रवीण फालक, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रा.नंदकिशोर सोनावणे व प्रा.सोसेस जाधव उपस्थित होते.समारोपप्रसंगी इंग्लिश मेडियम स्कूलचे विद्यार्थी व शिक्षकांनी जे.टी.महाजन यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला व भावगीते सादर केली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयFaizpurफैजपूर