शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

आदिवासींनी वनकर्मचाऱ्यांना तीन तास डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 21:29 IST

शेवरे येथील घटना : वृद्धास मारहाण केल्याने झाले संतप्त

---लोकमत न्यूज नेटवर्कबिडगाव, ता.चोपडा : देवझिरी वनक्षेत्रातील वरगव्हाण परिमंडळातील शेवरे येथे बुधवारी सकाळी वनकर्मचाऱ्यांनी वृद्धास मारहाण केली. या कारणावरून मारहाण करणारे सोडून दुसºयाच दोन वन कर्मचाºयांना शेकडो महिला व पुरूषांनी वाद घालत तब्बल तीन तास एका ठिकाणी डांबून ठेवल्याची घटना ७ आॅगस्ट रोजी घडली.वाचवण्यासाठी कर्मचारी जिव मुठीत घेतात.मात्र या गंभीर घटने नंतरही वन विभागाचे अधिकारी ईकडे फडकलेच नाही.शेवरे जवळील कक्ष क्रमांक १५५ मध्ये मोठ्या प्रमाणात वनजमीन काढण्याचे प्रकार सुरू आहेत. येथे वन कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना आबला वेलजी पावरा (५५) हा वृक्ष तोड करताना दिसला. वनमजुराने त्याला जबर मारहाण केली. यावेळी ते सोडण्यासाठी भायसा जाड्या पावरा (४०) हा गेला असता त्यालाही मारहाण केल्याचे आदिवासींनी सांगीतले. घटनेनंतर जखमी वृद्ध घरी गेल्यावर ही वार्ता गावात समजली. संतप्त होऊन शेकडो आदिवासी महिला-पुरूष वनात गेले. तिथे गस्त घालत असलेले इतर दोन कर्मचारी हैदर तडवी व राजेंद्र गौतम सोनवणे यांना गावात बोलवत ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मारहाण करणाºया कर्मचाºयांना येथे आणा तरच यांना सोडू, अशी भूमिका घेतली. तब्बल तीन तास त्यांना डांबून ठेवले. मात्र येथे एकही वन अधिकारी आले नाहीत. शेवटी परीसरातील काही ग्रामस्यांनी संतप्त आदिवासी बांधवांची समजूत घालत आधी जखमींना रूग्णालयात पाठवले. नंतर डांबलेल्या कर्मचाºयांना बाहेर काढत वरगव्हाणकडे रवाना केले. यानंतर शेकडो आदिवासी अडावद ठाण्यात गेले. मात्र तेथे काही प्रतिष्ठीत व्यक्तींच्या मध्यस्थीने समझोता झाल्याने गुन्हा दाखल झाला नाही.सदर जंगलात मात्र दिवसेंदिवस अतिक्रमण काढण्याच्या घटना घडत असतानाही त्या थांबवण्यात वनविभागाला अपयश येत आहे.वन अधिकारी फिरकलेच नाहीत...मारहाणीच्या घटनेनंतर येथे संतप्त महिला-पुरूषांनी वन कर्मचारी हैदर तडवी व गौतम सोनवणे यांना डांबून ठेवले होते. भेदरलेले कर्मचारी तब्बल तीन तास आदिवासींच्या ताब्यात होते. ही गंभीर घटना वरिष्ठांना कळवल्यानंतरसुद्धा कोणत्याही अधिकाºयाने येथे येण्याची तसदी घेतली नाही.मी घटनेबाबत वनपाल घोडे यांच्याशी बोललो आहे. मात्र कर्मचारी डांबल्याची काही घटनाच घडली नसल्याचे सहायक उपवन संरक्षक वसंत पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र तब्बल तीन तास कर्मचारी डांबून ठेवल्याची गंभीर घटना घडूनही वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते हे विशेष.