शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपचारात हलगर्जीपणा, जळगावात पाच डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 11:54 IST

तरुणीला आले अपंगत्व

ठळक मुद्देपायावर झाल्या आठ शस्त्रक्रियाएक्स रे काढल्यानंतर ममताच्या पायाला प्लास्टर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - उपचारात हलगर्जीपणा केल्याने ममता अनिल तायडे  या तरुणीला अपंगत्व आल्याने गणपती हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. शितल रुपचंद ओसवाल, डॉ.अजय कोगटा, डॉ.लिना अनुज पाटील, डॉ. विशाल पिंपरिया व डॉ. अमित हिवरकर या डॉक्टरांविरुध्द मंगळवारी ममता हिच्या फिर्यादीवरुन  रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा कलम 338 (हलगर्जीपणा)प्रमाणे दाखल झाला.काय आहे प्रकरण?़़़ पोलीस कर्मचारी अनिल तायडे यांच्या दुचाकीला 29 जुलै 2017 रोजी महामार्गावर अपघात झाला होता. त्यात मुलगी ममता हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तायडे व त्यांच्या मुलीला गणपती हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. एक्स रे काढल्यानंतर ममताच्या पायाला प्लास्टर बांधण्यात आले होते व या प्लास्टरमुळे तिच्या पायाच्या नसा तुटून पाय हत्ती रोगासारखा सुजला होता. चूक लक्षात आल्यानंतर डॉ.लिना पाटील यांनी प्लास्टर कापून रुग्णाला नाशिक येथे हलविले होते.तज्ज्ञांच्या समितीने अभिप्राय दिल्यानंतर दाखल झाला गुन्हा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तज्ज्ञाच्या समितीकडे हे प्रकरण गेले. त्यांनी उपचाराचे कागदपत्रे व रुग्ण यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उपचारात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाले. तसा अभिप्राय या समितीने पोलिसांना दिला व त्यानुसार मंगळवारी हा गुन्हा दाखल झाला.नाशिक येथे ममता हिच्या पायावर 5 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या शस्त्रकियेसाठी पुण्यात नेण्यात आले. तेथेही 3 शस्त्रक्रिया झाल्या. इतक्या शस्त्रक्रिया झाल्यावरही मुलगी स्वत:च्या पायावर उभी राहूशकतनाही. चुकीच्या प्लास्टरमुळे या शस्त्रक्रिया कराव्या लागल्याचे नाशिकच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. चुकीच्या प्लास्टरमुळे मुलीवर शस्त्रकिया कराव्या लागल्या व तरीही ती पायावर उभी राहत नसल्याने गणपती हॉस्पिटलचे डॉ.शितल ओसवाल व संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा यासाठी अनिल तायडे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.आमचा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे चौकशीला संपूर्ण सहकार्य केले जाईल.-डॉ.तेजस जैन, व्यवस्थापक, गणपती हॉस्पिटल