शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

मृत झालेल्या रुग्णावर डॉक्टरांकडून उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 9:24 PM

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होऊन त्यातही रुग्णाला मृत घोषीत करण्याऐवजी उपचार सुरु केल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यास नातेवाईकास नकार दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकिय महाविद्यालयात डॉक्टर नातेवाईकात वाद शवविच्छेदनास विरोध 

जळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होऊन त्यातही रुग्णाला मृत घोषीत करण्याऐवजी उपचार सुरु केल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यास नातेवाईकास नकार दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जैनाबाद येथील रवींद्र भिका पाटील (वय ४६) यांना शनिवारी दुपारी १२.१५ वाजता प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर पाटील यांना वॉर्ड क्र.९ मध्ये हलविण्यात आले. तेथे दुपारी साडे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांचा श्वास थांबल्याचे नातेवाईकांनी तेथील कर्मचाºयांच्या लक्षात आणून दिले, मात्र या कर्मचारी रुग्णाकडे धाव घेण्याऐवजी मोबाईलवर बोलण्यात गुंग होत्या. खडसावून बोलल्यानंतर डॉक्टरांनी धाव घेतली असता पाटील यांचा मृत्यू झाला नाही असे सांगून त्यांना दोन इंजेक्शन देण्यात आले. मृत रुग्णावर तुम्ही उपचार करीत असल्याचे नातेवाईकांनी सांगूनही डॉक्टर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी इसीजी करुन खात्री करण्याचा आग्रह नातेवाईकांना धरला असता पाटील मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वैद्यकिय अधिकारी स्वप्नील कळकर यांनी ४.३० वाजता पाटील यांना मृत घोषीत केले. दरम्यान, पाटील हे दाणाबाजारात ट्रकवर चालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी रंजना, मुलगा स्वप्नील, सागर व अक्षय असा परिवार आहे. शवविच्छेदनास विरोधरवींद्र पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करता मृतदेह थेट घरी नेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली, मात्र डॉक्टरांनी असा मृतदेह घरी नेता येत नाही. शवविच्छेदनानंतरच मृतदेह ताब्यात मिळेल असे सांगितले. त्यावरुन पुन्हा नातेवाईक व डॉक्टरात वाद झाला. जिल्हा पेठचे सहायक निरीक्षक संदीप आराक, शनी पेठचे उपनिरीक्षक डी.बी.पाटील, दिनेशसिंग पाटील व सहकाºयांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितल्याने वाद मिटला व मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.