जळगाव : समोरुन भरधाव वेगाने येणा:या कारला वाचविण्यात ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने त्या खाली दबून साहिल खान कामील खान पठाण (वय 4, पहुर, ता.जामनेर) ही बालिका व क्लिनर कृष्णा शंकर राजपूत (रा.लोहारा,ता.पाचोरा) हे दोन जण जागीच ठार झाले तर साहिलची आई सुपियाबी कामील खान पठाण (वय 30) या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात एकूण 13 प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता उमाळा गावाजवळ हा अपघात झाला. सपना ट्रॅव्हल्सची मिनी बस (क्र.एम.एच.19 जे.1294) ही शेंदुर्णी येथून सकाळी सात वाजता जळगावकडे येत असताना साडे सात वाजता ती उमाळ्याजवळ पोहचली, समोरून पांढ:या रंगाची कार भरधाव वेगाने येत होती. ती आपल्या अंगावर येत असल्याचे पाहून बस चालक रवींद्र पाटील याने कारला वाचविण्यात उतारवर क्लिनर साईडला जोरदार वळण घेतले. त्यात बस पलटी झाली. साहिलखान पठाण ही चार वर्षाची चिमुरडी तिची आई सुपियाबी व क्लिनर कृष्णा राजपूत हे ट्रॅव्हल्सखाली दबले गेले. त्यात चिमुरडीसह कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी जिल्हा रुग्णालयात गाठून नातेवाईकांचे सांत्वन केले.
कारला वाचविण्यात ट्रॅव्हल्स उलटली
By admin | Updated: October 17, 2015 01:07 IST