शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत ‘मेगाब्लॉक’ प्रवासी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:14 IST

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ४ ते ५ तास लेट

जळगाव : रेल्वेतर्फे ऐन सणासुदीत मंगळवारी बºहाणपूर जवळ चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सकाळच्या सत्रातील मुंबईकडे जाणाºया अनेक सुपरफास्ट गाड्या ४ ते ५ तासांने विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांना स्टेशनावर गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनातर्फे विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात येत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात तर पावसामुळे अनेक गाड्या ८ ते १० विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला. असे असतांना ऐन सणासुदीत रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी खंडवा ते बºयानपुर दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान मेगाब्लॉक घ्यावा लागला.यामुळे भुसावळहून मुंबईकडे जाणाºया अनेक सुपरफास्ट गाड्या वेळापत्रकानुसार ४ ते ५ तासाने विलंबाने धावल्या. खंडवा ते बºहाणपूर दरम्यान सुरु असलेल्या मेगाब्लॉकच्या कामामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या.निवडणुकीच्या कामात लालपरी अडकल्याने प्रवाशाचींही गैरसोयसोमवारी जळगाव आगारातील २५ बसेस निवडणूक कामासाठी घेण्यात आल्या होत्या. रात्री उशिरा या बसेस आगारात दाखल झाल्या. यामुळे सायंकाळी घराकडे जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते. तर दुसºया दिवशी पुन्हा गुजरातहून मागविलेल्या पोलीस बंदोबस्तला सोडण्यासाठी नऊ बसेस सोमवारी पहाटे गुजराथला रवाना झाल्या. तर पाच बसेस मुंबईच्या पोलिसांना सोडण्यासाठी गेल्या. यामुळे काही गावांच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन, प्रवाशांना पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागला.हजारो प्रवासी स्टेशनावर ताटकळलेमेगाब्लॉकमुळे भुसावळहून मुंबईकडे जाणाºया काशी एक्सप्रेस साडेचार तास लेट, कर्नाटक एक्सप्रेस तीन तास, मुंबई एलटीटी एक्सप्रेस तीन तास, पुष्पक चार तास, कामायानी एक तास व कुशीनगर एक्सप्रेस दोन तासाने विलंबाने धावली. विशेष म्हणजे जळगाव स्टेशनावर मुंबईला जाण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत एकही गाडी उपलब्ध नव्हती. यामुळे नाशिक-मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना स्टेशनावरच गाडीची वाट पहात ताटकळत बसावे लागले. या प्रकाराबद्दल प्रवाशांतर्फे रेल्वेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव