सोनगीर : तालुक्यातील सोनगीर शिवारात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडा अथवा जबरी चोरीच्या उद्देशाने फिरणा:या पाच संशयितांना सोनगीर पोलिसांच्या गस्तीपथकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. या संशयितांकडून पोलिसांनी दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच एक चारचाकी छोटी मालवाहू गाडी जप्त केली आहे. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील विहिरींमधील विद्युत पंप, वीज कंपनीचे साहित्य तसेच शेतक:यांची जनावरे चोरीच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार 5 ते 6 जणांच्या गटाने वाहनाद्वारे फिरत असल्याची माहिती खब:याकडून पोलिसांना मिळालेली होती. शिवाय सध्या कडाक्याची थंडी असल्याने शेतकरी शेतांमध्ये राहत नाहीत. त्यामुळे चोरटे सक्रिय होण्याची दाट शक्यता असल्याने सोनगीर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. 27 डिसेंबरला रात्री 11 वाजता सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. सुभाष जाधव, रवींद्र राजपूत, सदेसिंग चव्हाण, युवराज पाटील यांचे एक पथक जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर मध्यरात्रीच्या सुमारास तापी पाणीपुरवठा पाईप लाईनजवळ (एअर व्हॉल्व्ह स्टोन क्रमांक 2, 3, 9 जवळ) एक विनाक्रमांकाची चारचाकी संशयास्पदरीत्या उभी असलेली पथकाला दिसली. या गाडीची पोलिसांनी चौकशी केली. तिच्यात पाच जण बसलेले होते. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकातील पोलीस कर्मचा:यांनी गाडीची झडती घेतली असता 5 धारदार विळे, लोखंडी पहार, टॉमी, दोरखंड, नटबोल्ट खोलण्यासाठी लागणारे लहान-मोठे 10 पाने, वाहनांची कोरी नंबर प्लेट, लोखंडी सळई, 1 बॅटरी, लोखंडी करवत, 4 भ्रमणध्वनी संच असे दरोडय़ासाठी लागणारे साहित्य आढळले. पोलिसांनी पाचही संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना पोलीस कोठडी पोलिसांनी अटक केलेल्या पाचही संशयितांना सोमवारी दुपारी धुळे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेतील संशयितांकडून पोलीस माहिती काढत आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरोडा टाकण्याचा कट उधळला
By admin | Updated: December 29, 2015 00:18 IST