शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बारीपाड्याचा कायापालट करणारा किमयागार : चैत्राम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:29 IST

जळगाव येथील डॉ.मंजूषा पवनीकर यांनी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा (ता.साक्री) येथे नुकतीच भेट दिली. तेथील जनजीवन, वस्तुस्थिती जवळून पाहिली. त्यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेला लेख...

सातपुडा व सह्याद्रीच्या मधोमध वसलेला बारीपाडा नावाचा छोटासा वनवासी पाडा; पण चैत्राम पवार या किमयागाराने २७ वर्षांची मेहनत घेऊन या पाड्याचा कायापालट केलाय आणि बारीपाड्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविलंय. सात-सहा वर्षांपासून चैत्राम पवार यांच्याविषयी ऐकत्येय; पण भेटीचा योग जुळून येत नव्हता. अचानक तो आला.धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेला बारीपाडा हा अतिशय दुर्गम पाडा. पिंपळनेरनंतर अनेक फाटे पार करीत विचारत विचारत आम्ही बारीपाड्याला पोहोचलो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले गाव; पण प्रसिद्धीपासून अलिप्त याचे आश्चर्य वाटले. बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहीत नव्हते; परंतु चैत्राम पवार यांच्याविषयी बोलताना या गोष्टींचा उलगडा झाला.तरुण वयात संघाशी संबंध आला. त्यातून पाड्याचा विकास हेच ध्येय त्यांनी ठेवले. एम.कॉम. ही पदवी घेतली; परंतु आपल्या बांधवांनी प्रगती करावी, ही मनस्वी इच्छा बाळगली. मग साकारले बारीपाड्यातील विविध उपक्रम.वनवासी संस्कृतीची जपवणूक व संवर्धनबारीपाडा व आजूबाजूच्या सर्व पाड्यांवर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पिकांना कोणतेही रासायनिक खत देण्यात येत नाही. वृक्षांचा आदर करणारी वनवासींची संस्कृती आजही तेथे जपली जात आहे. अगदी प्रदूषण होते म्हणून गावात चैत्रामजींनी बससेवा नाकारली. पाड्यावर दोनच रिक्षा दळणवळणाचे काम करतात. एरव्ही लोक पायीच जातात. फोन नाही, मोबाइल टॉवर नाही. पशु-पक्ष्यांना मुक्तपणे व स्वच्छ वातावरण मिळावे ही चैत्रामजींची इच्छा. अगदी त्यांच्या घराच्या परिसरात ठिकठिकाणी रिकामे डबे, मोठे पाईप उंचावर बांधून ठेवलेय, चिमण्यांना घरटे म्हणून. शहरात नष्ट झालेली चिमणी-चिमणा शेकडोंच्या संख्येने तिथे आम्ही पाहिलेत.चैत्रामजी सांगतात, या जमिनीला निसर्गाचा आशीर्वाद आहे. इथे कोणतेही बी टाका, ते बहरतेच. याची प्रचिती म्हणजे फणस, सफरचंद यासारखी फळेसुद्धा येतायेत. वनवासी बांधव आपल्या गरजेपुरतेच कमावतात व धान्य साठवितात. त्यातीलच काही भाग बियाणे म्हणून वापरतात. त्यांना कधीच बाहेरून बियाणे आणण्याची गरज पडत नाही. तांदळाचा इंद्रायणी हा प्रकार विकसित केला. लवकरच तो प्रसिद्ध झाला. आज हजारो टन इंद्रायणी तांदूळ विक्री होत आहे. सोलर ड्रायरच्या माध्यमातून मोड आलेली मटकी, पालेभाज्या, कांदा कोरडा केला जातो. याची विक्री करण्याची योजना आहे.जंगलाची निर्मितीउजाड माळरानावर चैत्रामजींच्या २७ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे ११०० हेक्टर जंगल पसरले आहे. हे जंगल इतके दाट आहे की, जमिनीपर्यंत सूर्यप्रकाशदेखील पोहोचत नाही. आज चारशेवर विविध पक्ष्यांच्या जाती येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या वातावरणात स्ट्रॉबेरी व मशरूमचे पीक त्यांनी घेतले आहे. सध्या सफरचंदाची लागवड केली आहे.वनभाजी महोत्सवबारीपाड्याला खरी ओळख मिळाली, ती वनभाजी महोत्सव या अनोख्या स्पर्धेमुळे. २००४ पासून ही स्पर्धा चैत्रामजी घेत आहेत. पौष्टिक व दुर्मीळ अशा वनभाज्यांची ओळख जगाला करून देण्याचा हा उपक्रम आहे. साध्या पद्धतीने बनविलेल्या वनभाज्या पाड्यावरील महिलांनी करून आणायच्या व त्याचे औषधी गुणधर्म, कोणत्या रोगांवर किंवा दुखण्यावर त्या लाभदायक ठरू शकतात, याची माहिती द्यायची, अशी ही अनोखी स्पर्धा. जैवविविधता व आरोग्याच्या दृष्टीने या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आज प्राप्त झाले आहे. हजारो लोक या स्पर्धेच्या निमित्ताने बारीपाड्याला भेट देतात. गेल्या वर्षी विजेत्या महिलेने १५० भाज्या तयार केल्या होत्या व त्याचे आयुर्वेदिक महत्त्वही विशद केले होते. अशा प्रोत्साहनपर उपक्रम चैत्रामजी राबवत आहेत.चैत्रामजींच्या या अथक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना व बारीपाड्याला अनेक पुरस्कार व सन्मान मिळालेत. जर्मनी व कॅनडा येथील संशोधकांनी बारीपाड्यावर पीएच.डी. केलीय. २०१४ ला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम समितीने येथे भेट दिली. देशभरातून अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी गट येथे पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी येतात. जंगल, जमीन, जल, जन व जनावर या पाच मुद्यांवर चैत्रामजी काम करीत आहेत. जैवविविधता जपणे, जंगल संस्कृतीची राखण करण्याचे महत्त्वाचे काम ते करीत आहेत.हे करीत असताना आपण काही तरी वेगळे करीत आहोत, असा अभिनिवेश त्यांचा नाही. केंद्रीय पर्यावरण समितीमध्ये त्यांची निवड झालीय. अत्यंत साधी राहणारी. घरी येणाºया प्रत्येकाचे योग्य आदरातिथ्य, आपुलकीची वागणूक याची प्रचिती आम्ही घेतली. त्यांचा पीए नाही की असिस्टंट. विमल वहिनींची समर्थ साथ त्यांना मिळाली आहे. आपण जगावेगळे काम करीत आहोत, याचा लवलेशही या दाम्पत्यामध्ये नाही. हे बघून आपण नतमस्तक होतो. आपण हजारो, लाखो रुपये खर्च करून तीर्थक्षेत्रांना जातो. माझ्या मते बारीपाड्यासारख्या तीर्थक्षेत्रांना आपण भेटी दिल्या पाहिजेत.डॉ.मंजूषा पवनीकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव