शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळोद-बुधगाव पुलाचे हस्तांतर रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:15 IST

अमळनेर : दुरुस्ती झाल्याशिवाय जलसंपदाकडून पूल ताब्यात घेण्यास बांधकाम विभागाची ना

अमळनेर : चोपडाव अमळनेर तालुक्याला जोडणारा तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अल्पावधीत या  पुलालगतचा भराव खचला.  रस्त्यावर खड्डे पडले. ही सर्व दुरुस्ती करण्यासाठी सव्वादोन कोटी रूपयांची आवश्यकता आहे. मात्र तेवढा निधी मिळत नसल्याने, जलसंपदा विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाचे हस्तांतरण रखडलेले आहे. तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून 1999 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2011 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणारा हा पूल असल्याने, या पुलावरून वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर वाढली. मात्र  पुलाच्या  दोन्ही बाजूला असणा:या रस्त्याची  दुर्दशा झाली. रस्त्यालगतचा असणारा भराव खचला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत,.पुलाच्या दोन्ही बाजूच्या भराव काटेरी झुडपांनी वेढला आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे.पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्तीची जबाबदारी या विभागाची आहे. पुलाच्या भरावांची आणि खडय़ांच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 28 लाख रुपये खर्च लागणार आहेत.  या वर्षी जलसंपदा विभागाला केवळ सहा कोटीचा निधी शासनाकडून मिळाल्याने पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नसल्याचे जलसंपदा विभागाच्या चोपडा कार्यालयाने सांगितले.तर पुल सुस्थित असल्याशिवाय ताब्यात घेणार नसल्याचे  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमळनेर कार्यालयाने स्पष्ट केले आहे.या पुलामुळे चोपडा,शिरपूर आणि मध्यप्रदेशाला जाण्यासाठीचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेतदेखील बचत होत असते,गेल्या पाच वर्षात पुलावरील वाहतूक वाढली आहे. त्यामानाने पुलाची आणि पुलाच्या भरावांची काळजी घेण्यात आली नाही.पूल जलसंपदा विभागाकडे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची काळजी घेतली जात नाही. पुलाच्या हस्तांतर बाबत जलसंपदा विभाग  आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संयुक्तपणे पुलाला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी  हस्तांतर प्रक्रिया सुरू केली आहे.    (वार्ताहर)