शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

ट्रकमध्ये कोंबून कामगारांची वाहतूक, ९५ जणांविरुध्द गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:15 IST

अजिंठा चौकात पकडले

जळगाव : जमावबंदी आदेशवसीमाबंदीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी असतानाही मुंबई येथून ट्रकमधून उत्तर प्रदेशात जाणाºया ९५ जणांना सोमवारी मध्यरात्री सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी अजिंठा चौकात पकडले. दरम्यान, ट्रक चालकासह या सर्व जणांविरुध्द कलम १८८ अन्वये एमआयडीसी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन हे सोमवारी रात्री विभागीय गस्तीवर होते. रात्री १ वाजता अजिंठा चौकातून जात असताना मुंबईकडून येणारा ट्रक रोहन यांनी थांबविला असता त्यात जनावरांसारखे ९५ जण कोंबून व दाटीवाटीने बसलेले होते. आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना या लोकांनी केलेल्या नव्हत्या. अधिक चौकशी केलीअसताहे सर्व कामगार असून मुंबईत वेगवेगळ्या भागात काम करीत होते. संचारबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली, त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशातील गावाकडचा रस्ता पकडला होता. विशेष म्हणजे मुंबईहून निघालेल्या या ट्रकला नाशिक, धुळे, इगतपुरी, ठाणे, कल्याण येथे कोणीही अडविले नाही किंवा टोलनाक्यावर विचारपूस झाली नाही. जळगाव शहरात प्रवेश केल्यावर हे वाहन डॉ.नीलाभ रोहन यांच्या निदर्शनास आले. अंगरक्षक विजय काळे यांनी एमआयडीसी पोलिसांना पाचारण करुन या कामगारांना राधाकृष्ण मंगल कार्यालयात रवाना करण्यात आले. तेथे सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी व निवारा तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली.तोंडाला मास्क न लावणाºया पाच जणांविरुध्द गुन्हाकोरोना या संर्सगजन्य आजारापासून संरक्षण होण्याकरीता घराबाहेर निघालेल्या प्रत्येक व्यक्तीने तोंडाला मास्क किंवा रुमाल लावणे बंधनकारक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी न करणाºया पाच वाहनचालकांविरुध्द एमआयडीसी पोलिसात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अन्वर शब्बीर कुरेशी (३० रा. मासुमवाडी जळगाव), हमीद लालखॉ पठाण्(४४ रा. मेहरुण), दीपक रामचंद्र्र ठाकूर (२८ रा. वराडसीम ता. भुसावळ), राजाराम सोपान अपार (४६ रा. खुबचंद साहित्यानगर) व गणेश कडुबा घोंगडे (२४ रा.पहुर) यांचा त्यात समावेश आहे. हे वाहनधारक कोणतीही खबरदारी न घेता तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावता विनाकारण फिरताना अजिंठा चौफुली परिसरात आढळून आले. पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील ,रामकृष्ण पाटील, राजेंद्र ठाकूर, कृष्णा पाटील , श्रीकांत बदर ,चेतन सोनवणे, सचिन पाटील व योगेश बारी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव