शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भुसावळात पाच तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:35 IST

नियोजनाचा अभाव : वाहनधारकांसह पोलिसांची उडाली तारांबळ

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे चौकात नियोजनाअभावी बुधवारी तब्बल पाच तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली. तर वाहतूक शाखेच्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.शहरातील मामाजी टॉकीज रोडचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. हे काम आता दगडी पुलापर्यंतपर्यंत आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यात पांडुरंग टॉकीज ते बस स्टँड परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. सकाळी दहाला वर्दळीच्या वेळेस या रस्त्यावर वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती, तर याच वेळेस आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर दहाच्या सुमारास शाळा सोडण्यात आल्या.यावल रोडवर डी.एस. हायस्कूल, सेन्ट आलायस, के.नारखेडे विद्यालय तसेच जामनेर रोडवरील म्युनिसीपल हायस्कूल, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, महाराणा प्रताप स्कूल यासह इतर असलेल्या शाळा एकाच वेळेस अचानक सुटल्या. यामुळे या रस्त्यावरून एकच गर्दी झाली.शाळांमधील विद्यार्थी व कामावर जाणारा नोकर वर्ग त्यामुळे अचानक गर्दी झाल्याने तिन्ही बाजूस वाहतूक ठप्प झाली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस कमी असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांची अक्षरश: दमछाक झाली. दुपारी अडीच वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती. एकंदरीत, नियोजनाअभावी ही गर्दी झाली व तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली. याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो.बसस्थानक ते पॉडुरंग टॉकीजपर्यंत वाहन रांगाबहुतांशी वाहनधारकांनी आपला मार्ग बदलून टाकला होता. बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून पूर्वेकडे एसटी स्टॅडपर्यंत तर पश्चिमेकडे पांडुरंग टॉकीजपर्यंत एसटी बसेस, चार चाकी वाहने, रिक्षा व मोटारसायकल यांच्या रांगा लागल्या होत्या, तर हंबर्डे चौकापर्यंत दुचाकी रिक्षा व चारचाकी वाहनांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यास वाहतूक शाखेच्या पोलिसांना तब्बल पाच तास लागले. वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाले नव्हते.अजून काही दिवस त्रासशहरातील मामाजी टॉकीज जवळील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या एकाच रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यात शाळा सुटण्याची वेळ, नोकर व व्यापारी वर्ग कामावर जाण्याची वेळ एकच आहे. त्यामुळे काही काळाकरता वाहतुकीचा त्रास वाढला आहे. हा त्रास काही दिवस राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीBhusawalभुसावळ