शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील कजगाव परिसरात देव उजाळून घेण्याची परंपरा आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:58 IST

लग्नसोहळ्याच्या आधी सोनार बांधवांकडून देव उजाळून घेण्याची परंपरा कजगावसह परिसरात आजही कायम आहे. जुन्या काळातील रूढी परंपरा आजही ग्रामीण भागात कटाक्षाने पाळल्या जातात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या परंपरांची कोणतीही माहिती नसलेले युवक-युवती या परंपरांचा मनमुराद आनंद घेतात, कारण त्याची आख्यायिका वडिलधाऱ्या मंडळीकडून मोठ्या कुतूहलाने ऐकली जाते व ते या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. अशीच काही प्रथा ग्रामीण भागात मोठ्या आनंद सोहळ्यात पार पडत असते.

ठळक मुद्देविवाह सोहळा सुरू होताना देवी-देवतांना करतात प्रसन्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडावा अशी या मागील भावनाग्रामीण भागात अशा काही सोहळ्याविना होत नाही विधी

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव , जि.जळगाव : लग्नसोहळ्याच्या आधी सोनार बांधवांकडून देव उजाळून घेण्याची परंपरा कजगावसह परिसरात आजही कायम आहे.जुन्या काळातील रूढी परंपरा आजही ग्रामीण भागात कटाक्षाने पाळल्या जातात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या परंपरांची कोणतीही माहिती नसलेले युवक-युवती या परंपरांचा मनमुराद आनंद घेतात, कारण त्याची आख्यायिका वडिलधाऱ्या मंडळीकडून मोठ्या कुतूहलाने ऐकली जाते व ते या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. अशीच काही प्रथा ग्रामीण भागात मोठ्या आनंद सोहळ्यात पार पडत असते.विवाह सोहळा सुरू होताना देवी-देवतांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे. या सोहळ्याची सुरुवात देव उजाळण्यापासून सुरू होते. भाऊबंदकीची देव, हळदीच्या पहिल्या दिवशी सोनार बांधवांकडे देव उजाळण्यासाठी दिले जातात. ते दुसºया दिवशी (हळदीच्या दिवशी) दुपारी सवाद्य मिरवणुकीने लग्न समारंभ स्थळी नेले जातात. या मागचे कारण लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, सारे कार्य आनंदात व्हावे, अशी या मागील भावना आहे. हळदीच्या कार्यक्रमानंतर रात्री भाऊबंद एकत्र येऊन रात्री देव डोक्यावर घेऊन नाचतात. याप्रमाणे विवाह सोहळ्याची सुरुवात उत्साहात होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर भाऊबंदाचे देव देव्हारी परततात, अशा पध्दतीने लग्न सोहळ्यातील देव उजाळणे कार्यक्रम होत असतो. 

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव