यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथे मुख्य चौकातील अरुण अमृत चौधरी व गुलाब अमृत चौधरी यांच्या घराजवळील निंबाचे जुने झाड गुरुवारी ८ रोजी अचानक कोसळून त्याठिकाणी उभे केलेले ट्रॅक्टर दाबले गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.थोरगव्हाण तालुका यावल येथील अरुण अमृत चौधरी यांच्या मालकीच्या (एम एच १९-९६३८) या ट्रॅक्टरवर अचानक गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निंबाचे झाड पडून ट्रॅक्टर दाबले जाऊन ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे थोरगव्हाण मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजूबाजूला म्अनेक घरं होती. दुपारच्यावेळी तरुण व वृद्ध या झाडाखाली सावलीत बसतात.मात्र गुरुवारी दोन-तीन जण जाणकार या ठिकाणी होते, झाड कोसळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच या ठिकाणाहून पलायन केले अन्यथा हे तिघे चौघेजण दाबले गेले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
निंबाचे झाड पडल्याने ट्रॅक्टरचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 22:15 IST