शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘विकास मॉडेल’च्या अभ्यासासाठी  २० पालिकांचा उज्जैन, इंदूर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2023 18:18 IST

घनकचरा व्यवस्थापन, नागरी सुविधांसह प्रणालींचा केला अभ्यास

जळगाव : जिल्ह्यातील २० नगरपालिका, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या अधिकाऱ्यांनी इंदूर आणि उज्जैन महापालिका क्षेत्रांना भेटी देत तिथल्या घनकचरा व्यवस्थापन व नागरी सुविधांचा अभ्यास केला. या दोन्ही ‘मॉडेल’ ठरलेल्या महापालिकांच्या धर्तीवर जिल्ह्यात विकास साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले होते.पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, तसेच लोकप्रतिनिधींनी या दोन्ही महापालिकांचा अभ्यास करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २० पालिकांच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला अभ्यास दौऱ्यावर पाठविले होते. 

सर्वच प्रणालींचा अभ्यास

नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरी प्रशासनात लोकसहभाग वाढवण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी प्रशिक्षणासह अभ्यास दौरा उजवा ठरला आहे. उगमस्थानी कचऱ्याचे पृथक्करण सुनिश्चित करण्यासाठी वर्तणुकीतील बदल घडवून आणण्याच्या पद्धती त्यांना समोर आल्या. त्यांनी प्रत्यक्ष कालावधी जपण्यासाठी ‘ऑपरेशनल’ कार्यक्षमता आणण्यासाठी सर्वच  प्रणालींचा अभ्यास केला. त्यांनी महसूल निर्मिती मॉडेल्स आणि पुनर्प्राप्त केलेल्या कचऱ्यापासून मालमत्ता तयार करण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. त्यानुसार शहरे कचऱ्यापासून वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र बनू शकतात, असा विश्वास या शिष्टमंडळाने व्यक्त केला. तर इंदूर आणि उज्जैन महापालिकेच्या प्रशासनाने जळगावच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे आभारही मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव